खतरनाक 'कलंक', वरुणच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

मुंबई : अभिनेता वरुण धवन याच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ‘कलंक’ असे सिनेमाचे नाव असून, करण जोहर या सिनेमाचा मुख्य निर्माता आहे. सिनेमाचं शूटिंग सुरु असताना, वरुण धवन सातत्याने फोटो शेअर करत होता, त्यामुळे सिनेमाची उत्सुकता सिनेरसिकांमध्ये शिगेला पोहोचली होती. अखेर सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे. निर्माता करण जोहरने ‘कलंक’बद्दल भावूक होत …

खतरनाक 'कलंक', वरुणच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

मुंबई : अभिनेता वरुण धवन याच्या नव्या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. ‘कलंक’ असे सिनेमाचे नाव असून, करण जोहर या सिनेमाचा मुख्य निर्माता आहे. सिनेमाचं शूटिंग सुरु असताना, वरुण धवन सातत्याने फोटो शेअर करत होता, त्यामुळे सिनेमाची उत्सुकता सिनेरसिकांमध्ये शिगेला पोहोचली होती. अखेर सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं आहे.

निर्माता करण जोहरने ‘कलंक’बद्दल भावूक होत सोशल मीडियावर म्हटलंय की, “एक असा सिनेमा, ज्याने माझ्या डोक्यात 15 वर्षांपूर्वीच जन्म घेतला आहे, ऐक असा सिनेमा, ज्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे, एक असा सिनेमा, ज्यावर माझ्या वडिलांनीही त्यांच्या निधनाच्या आधी काम केलं आहे, या सिनेमाला प्रत्यक्षात पाहणं वडिलांचं स्वप्न होतं, त्यांचं स्वप्न मी पूर्ण करु न शकल्याने माझं मन मलाच खात होतं, अखेर ते स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. नातं आणि शाश्वत प्रेमाच्या कथेला आवाज मिळाला आहे. मला उत्सुकता आहे, काळजीत आहे आणि भावूक सुद्धा आहे. मला आशा आहे की, प्रेमाच्या या वाटचालीत तुम्हीही सहभागी व्हाल.”

‘कलंक’ सिनेमा मल्टी-स्टारर सिनेमा आहे. अभिनेता वरुण धवनसोबतच अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता आदित्य रॉय-कपूर, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि कुणाल खेमू या सिनेमात दिसणार आहेत. अभिषेख वर्मन यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.

पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात ‘कलंक’ सिनेमा रिलीज होणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *