ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांचे निधन झालं. मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटल (नेपेन्सी रोड) इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षांचे होते. हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी यासारख्या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिका, तसंच माहेरची साडी, अष्टविनायक यासारख्या लोकप्रिय सिनेमात त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. मराठीतील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. जून 2018 मध्ये मराठी नाट्य संमेलनात अभिनेते […]

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे निधन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर (Ramesh Bhatkar) यांचे निधन झालं. मुंबईतील एलिझाबेथ हॉस्पिटल (नेपेन्सी रोड) इथं त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 70 वर्षांचे होते. हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी यासारख्या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिका, तसंच माहेरची साडी, अष्टविनायक यासारख्या लोकप्रिय सिनेमात त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या. मराठीतील एव्हरग्रीन अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती. जून 2018 मध्ये मराठी नाट्य संमेलनात अभिनेते रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. रमेश भाटकर यांनी जवळपास 30 वर्षे फिल्म आणि टीव्ही क्षेत्रात काम केलं.

रमेश भाटकर यांचा जन्म 1949 मध्ये झाला. त्यांचे वडील स्नेहल (वासूदेव) भाटकर हे गायक आणि संगीत दिग्दर्शक होते. रमेश भाटकर हे महाविद्यालयीन काळात उत्तम जलतरणपटू तसंच उत्तम खो खो पटू होते. त्यांनी अनेक स्पर्धाही गाजवल्या.

रमेश भाटकर यांनी चांदोबा चांदोबा भागलास का (1977) या सिनेमातून मुख्य प्रवाहातील सिनेक्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अष्टविनायक (1978), दुनिया करी सलाम, माहेरची माणसं, आपली माणसं आणि माहेरची साडी (1991), लेक चालली सासरला या सिनेमातील भूमिकांमुळे रमेश भाटकर हे नाव घराघरात पोहोचलं. त्यांनी जवळपास 90 सिनेमांमध्ये काम केलं. त्यापैकी बहुतेक मराठी तर काही हिंदी सिनेमे आहेत.

रमेश भाटकर यांचा अल्पपरिचय

रमेश भाटकर यांनी 1977 च्या चांदोबा चांदोब बागलास का या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं

यानंतर अष्टविनायक (1978), दुनिया करी सलाम, माहेरची माणसं, आपली माणसं, माहेरची साडी, लेक चालली सासरला या सिनेमात प्रमुख भूमिक साकारली

मराठी आणि हिंदी सिनेमांमध्येही काम

हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी या मालिका लोकप्रिय झाल्या

कमांडर, तिसरा डोळा या मालिकांमधून ते घराघरात पोहोचले

सरकारनामा, सातच्या आत घरात, सावरखेड एक गाव, काय द्यायचे बोला, दुनिया करी सलाम, सोबती, वहिनीची माया, मी चेअरमन बोलतोय, प्रेम करुया खुल्लम खुल्ला, रंगत संगत, आई पाहिजे, मधु चंद्राची रात्र, हमाल दे धमाल, दे टाळी, लपवा छपवी, बॉम्बे वॉर, माहेरची साडी, बंधन, आपली माणसं, सवत माझी लाडकी, पैसा पैसा पैसा, घायल, बॉम्ब ब्लास्ट, बेदर्दी, सहमे हुए सितारे, बदमाश, हफ्ता वसुली, सेन्सर, जयदेव, मराठा बटालियन अशा अनेक सिनेमांमध्ये रमेश भाटकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आणि त्या गाजवल्या.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.