ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचं निधन

श्रवण राठोड यांच्यावर मुंबईतील माहीममधील रुग्णालयात उपचारही सुरू होते, परंतु उपचारादरम्यान आज त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं. Shravan Rathod no more

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:04 PM, 22 Apr 2021
ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचं निधन

मुंबईः ज्येष्ठ बॉलिवूड संगीतकार श्रवण राठोड यांचं कोरोनानं निधन झालंय. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रवण राठोड यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतील माहीममधील रुग्णालयात उपचारही सुरू होते, परंतु उपचारादरम्यान आज त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं. (Veteran Bollywood musician Shravan Rathod no more)

संगीतकार नदीम सैफी यांच्याकडून वृत्ताला दुजोरा

संगीतकार नदीम सैफी यांनीसुद्धा या वृत्ताला दुजोरा दिलाय. ते म्हणाले, “माझे शानू आता राहिले नाहीत. आम्ही संपूर्ण आयुष्य एकत्र घालवले. आम्ही अनेक यशोशिखरंही पाहिली. आम्ही एकमेकांकडे बघूनच मोठे झालो. आमचा संपर्क कधीच तुटला नाही, अशा भावनाही नदीम सैफी यांनी व्यक्त केल्या.

शेवटच्या दिवसांत ते व्हेंटिलेटरवर होते

66 वर्षीय संगीतकार असलेल्या श्रवण राठोड यांना माहीमच्या एसएल रहेजा रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी त्यांना आयसीयूमध्ये निरीक्षणाखाली ठेवले होते. शेवटच्या दिवसांत ते व्हेंटिलेटरवर होते. श्रवण हे मधुमेहग्रस्त होते आणि त्यातच त्यांच्या फुफ्फुसांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे हृदयाची गती मंदावली होती. तसेच अनेक आजारांनाही डोकं वर काढलं होतं. 1990 च्या दशकात नदीम-श्रवण यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये सुपरहिट गाणी दिली. आशिकी, साजन, परदेस ते राजा हिंदुस्थानीपर्यंत या दोघांनी अनेक विशेष अल्बमसाठी गाणी गायली.

दोघांनीही संगीताच्या जगात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली

श्रवण राठोड यांनी एकेकाळी नदीम सैफींबरोबर अनेक गाणी गायलीत. या जोडीला प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम दिले. नदीम श्रवण या दोघांनीही संगीताच्या जगात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. या दोघांनीही यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली. या जोडीने पहिल्यांदाच 1979 मध्ये भोजपुरी चित्रपट ‘दंगल’मध्ये संगीत दिले होते. पण नदीम-श्रावण यांना खरी ओळख ‘आशिकी’ चित्रपटापासून मिळाली. या चित्रपटाची गाणी सुपरहिट झाली. त्यांची जोडी गुलशन कुमारची टी मालिकेची आवडती जोडी होती. गुलशन कुमार यांच्या हत्येच्या आरोपावरून नदीम सैफी यांना देश सोडून लंडनमध्ये स्थायिक व्हावे लागले होते. नदीम सैफी 2000 पासून लंडनमध्ये राहत होते. 1997 मध्ये गुलशन कुमार यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप नदीम यांच्यावर ठेवण्यात आला होता.

संबंधित बातम्या

‘तुझ्या पप्पांना काही होऊ देणार नाही, 1 तासात व्हेंटिलेटर मिळेल’, सोनू सूद पुन्हा मदतीला धावला

PHOTO | घरीच राहून सोनाक्षी सिन्हाने घटवले वजन, ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहतेही झाले चकित!

Veteran Bollywood musician Shravan Rathod no more