कॉमेडीचा बादशाह कादर खान व्हेंटिलेटर

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डरमुळे (PSP) कादर खान यांच्या मेंदूने काम करणं बंद केले आहे. त्यामुळे त्यांना BiPAP व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. अभिनेते कादर खान खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत सुमारे 43 वर्षे काम केले. जवळपास 300 हून अधिक सिनेमांमधून अभिनय आणि 250 हून …

कॉमेडीचा बादशाह कादर खान व्हेंटिलेटर

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी डिसऑर्डरमुळे (PSP) कादर खान यांच्या मेंदूने काम करणं बंद केले आहे. त्यामुळे त्यांना BiPAP व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

अभिनेते कादर खान खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत सुमारे 43 वर्षे काम केले. जवळपास 300 हून अधिक सिनेमांमधून अभिनय आणि 250 हून अधिक सिनेमांच्या संवाद लेखन केले आहे.  2015 मध्ये आलेल्या ‘दिमाग का दही’ या सिनेमात ते शेवटचे दिसले होते. ते आता 81 वर्षांचे आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून कादर खान हे कॅनडात आपला मुलगा सरफराज आणि सून शाइस्ता यांच्यासोबत राहत आहेत. सध्या त्यांच्यावर कॅनडातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

2017 साली कादर खान यांच्या गुडघ्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना नीट उभं राहता येत नाही. शिवाय ते जास्त वेळ चालूही शकत नाहीत. त्यामुळे अनेक वर्षे ते व्हिलचेअरवरच आहेत.

कादर खान यांचा अल्पपरिचय :

कादर खान यांचा स्वातंत्र्यपूर्व काळात 22 ऑक्टोबर 1937 रोजी अफगाणिस्तानातील काबुल येथे जन्म झाला. 1971 ते 2017 इतका मोठा काळ ते हिंदी सिनेसृष्टीत सक्रीय राहिले. अभिनय, संवाद लेखन, दिग्दर्शन अशा सिनेमाशी संबंधित महत्त्वाच्या अंगांवर त्यांनी आपल्या कलागुणांनी ठसा उमटवला. 1973 साली ‘दाग’ या सिनेमातून कादर खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. कादर खान यांनी 300 हून अधिक हिंदी सिनेमांमधून काम केले आहे. सुमारे 250 हून अधिक सिनेमांचं संवादलेखन त्यांनी केले आहे.

कादर खान यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवलं आहे. 2013 साली साहित्य शिरोमणी पुरस्काराने कादर खान यांचा गौरव करण्यात आला. कादर खान यांना तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

1982 – सर्वोत्तम संवादलेखक – मेरी आवाज सुनो
1991 – सर्वोत्तम विनोदी अभिनेता – बाप नंबरी बेटा दस नंबरी
1993 – सर्वोत्तम संवादलेखक – अंगार

याचसोबत तब्बल 9 वेळा कादर खान यांनी फिल्म फेअरची नामांकनं मिळाली आहेत. या नऊही वेळा विनोदी अभिनेता म्हणून त्यांना नामांकनं मिळाली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *