VIDEO : प्रियांकाची हेअर स्टाईल सोडा, हा मेकअप बघा!

नवी दिल्ली : मेट गाला 2019 कार्यक्रमात काल (7 मे) अनेक कलाकारांनी आपला हटके लूक दाखवला. या कार्यक्रमात प्रत्येक कलाकाराने वेगवेगळे कपडे, मेकअप आणि हेअरस्टाईल दाखवली. या कार्यक्रमात भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही आपल्या हेअर स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांकाच्या हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रोल झाली. प्रियांकाच्या या हेअर स्टाईलची चर्चा असताना, आता …

VIDEO : प्रियांकाची हेअर स्टाईल सोडा, हा मेकअप बघा!

नवी दिल्ली : मेट गाला 2019 कार्यक्रमात काल (7 मे) अनेक कलाकारांनी आपला हटके लूक दाखवला. या कार्यक्रमात प्रत्येक कलाकाराने वेगवेगळे कपडे, मेकअप आणि हेअरस्टाईल दाखवली. या कार्यक्रमात भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही आपल्या हेअर स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. प्रियांकाच्या हेअर स्टाईलमुळे सोशल मीडियावर ती प्रचंड ट्रोल झाली.

प्रियांकाच्या या हेअर स्टाईलची चर्चा असताना, आता हॉलिवूड अभिनेता इजारा मिलरच्या मेकअपची चर्चा सुरु झाली आहे. या अभिनेत्याचा मेकअप पाहून अनेकजण अवाक् झाले.

इजरा मिलरने या कार्यक्रमात एक मास्क लावून एण्ट्री केली. यानंतर त्याने चेहऱ्यावरचा मास्क काढत सर्वांना मेकअपचे दर्शन दिले. यावेळी सर्वजण थोड्या वेळासाठी गोंधळून गेले. कारण मिलर यांच्या चेहऱ्यावर सात डोळे दिसत होते. हे डोळे पाहून सर्वचजण थक्क झाले. यामध्ये मिलरचे खरे डोळे ओळखणे सर्वांसाठी अवघड होते. मिलरने हा मेकअप कॅनडाची प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट मिमीने केला.

 

View this post on Instagram

 

4AM start to get Ezra Miller ready for Met Gala 2019! ? #metcamp #metgala #metgala2019 #ezramiller #campnotesonfashion ⁣ ⁣ Because the makeup had to be ready by 9:30AM for photoshoots and last till end of the day, I had to make sure the makeup was stable all day long. I used @mehronmakeup Mimi Choi Illusion Palette, @kryolanofficial Aquacolor, @makeupforeverofficial Artist Color Pencils, and @velourlashesofficial @houseoflashes falsies for the multiple eye illusion. Skin was done using @kevynaucoin Skin Enhancer and @katvondbeauty Shade+Light Face Contour Palette. Lips were @maccosmetics Ruby Woo. The whole face was thoroughly set with Green Marble Sealer. ⁣ ⁣ Thank you for all the love! I’ll be sharing more behind-the-scenes of our Met prep throughout this week. ❤️ ⁣ ⁣ Makeup: me⁣⁣⁣ Makeup assist: @paulalanzador⁣⁣⁣⁣⁣ Hair: @samiknighthair ⁣⁣⁣ Nails: @naominailsnyc

A post shared by MIMI CHOI (@mimles) on

“या मेकअपची सुरुवात सकाळी 4 वाजता केली. हा मेकअप पूर्ण करण्यासाठी पाच तास लागले. हा मेकअप सकाळी 9.30 वाजता पूर्ण झाला. मात्र मला पूर्ण दिवस त्याच्यासोबत राहावे लागले, कारण मेकअपला मध्ये टचअप द्यावा लागत होता”, असं मेकअप आर्टिस्ट मिमी म्हणाली.

यापूर्वीही मिमीने अनेक हटके असे मेकअप केले आहेत. विशेष म्हणजे चेहऱ्यावर थ्रीडी मेकअप करण्यात मिमी प्रसिद्ध आहे. मिमीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने केलेल्या अनेक मेकअपचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *