VIDEO : नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर कसा आहे?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व मोदी समर्थक ज्या सिनेमाची प्रतिक्षा करत होते. तो ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. येत्या 5 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरविषयी लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. कारण हा सिनेमा सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी …

VIDEO : नरेंद्र मोदींच्या बायोपिकचा ट्रेलर कसा आहे?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व मोदी समर्थक ज्या सिनेमाची प्रतिक्षा करत होते. तो ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा सिनेमा आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. येत्या 5 एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरविषयी लोकांमध्ये खूप उत्सुकता होती. कारण हा सिनेमा सध्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आहे. त्यामुळे मोदींचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास कसा होता हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सिनेमाचा ट्रेलर आतापर्यंत 35 लाखाच्यावर लोकांनी बघितला आहे.


मोदींच्या याच प्रवासाची एक झलक ‘पीएम नरेंद्र मोदी’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. हा ट्रेलर अडीच मिनिटांचा आहे. या अडीच मिनिटांच्या ट्रेलरमध्ये मोदींच्या जीवनातील वेगवेगळे टप्पे आणि महत्त्वाच्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. एक चहाविक्रेत्या ते भारत देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये पंतप्रधान पदापर्यंच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी आणि पंतप्रधान झाल्यावर उद्भवलेले वाद आणि त्यातून मार्ग काढत पुढे जाणारे मोदी दाखवण्यात आले आहे. या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे, या सिनेमात आपल्याला फक्त आणि फक्त मोदीच दिसणार आहेत.

अभिनेता विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केलं आहे. विवेक ओबेरॉयने अत्यंत उत्कृष्ट मोदी साकारले आहेत. तो मोदींच्या लूकला पूर्णपणे न्याय देण्यात यशस्वी ठरला आहे. मोदींची भूमिका साकारणे हे अत्यंत कठीण काम विवेकने मोठ्या जबाबदारीने पार पाडलं आहे. त्याच्या मेकअपपासून ते कपड्यांपर्यंत, त्याच्या चालण्या-बोलण्या, तसेच त्याच्या अभिनयातही मोदीच दिसतात. त्यामुळे त्याने या भूमिकेला न्याय दिला आहे, हे बोलण्यात हरकत नाही.

विवेक ओबेरॉयसोबतच या सिनेमात बोमन इराणी, इरीना बहाव, बरखा बिष्ट, मनोज जोशी, प्रशांत नारायणन यांसारखे कलाकार दिसणार आहेत. बोमन इराणी यात रतन टाटा यांच्या भूमिकेत असणार आहेत,  तर मनोज जोशी हे अमित शाह यांची भूमिका साकारत आहेत. हा सिनेमा येत्या 5 एप्रिलला हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडीओ :

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *