अन् त्यावरून पक्क झालं विजय आणि रश्मिकाचा साखरपुडा झाला; विजयच्या अंगठीचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण त्या दोघांनी अजूनही त्यावर कोणतं भाष्य केलेलं नाही. पण सध्या विजयचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात विजयच्या बोटातील त्या अंगठीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यावरून विजय देवरकोंडा आणि रश्मिकाचा साखरपुडा झाल्याचा अंदाज चाहते लावत आहेत.

विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी गुपचूप साखरपुडा केल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याबद्दल काहीही पोस्ट केलेले नाही. किंवा या बातम्यांवर काहीही भाष्य केलेलं नाही. तथापि, त्यांच्या टीमने याची पुष्टी केली आहे. तसेच याच दरम्यान एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये विजयने घातलेल्या एका अंगठीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
व्हिडिओमध्ये विजयने घातलेली अंगठी दिसत आहे
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न करणार आहेत, अशी बातमी काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या टीमने दिली होती. अलिकडेच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये विजयने घातलेली अंगठी दिसत आहे. ज्यामुळे चाहतेही आनंदी झाले असून त्यावर कमेंट्सही करत आहेत.
त्यावरून रश्मिका आणि विजय यांचा साखरपूडा झाल्याच्या बातम्या खऱ्या
विजयने श्री सत्य साई बाबा महासमाधीचे दर्शन घेण्यासाठी पुट्टपर्ती (आंध्र प्रदेश) येथे भेट दिली होती. श्री सत्य साई बाबा महासमाधी दर्शनादरम्यान विजय देवरकोंडाचे संघटनेच्या सदस्याकडून पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत करण्यात आले. तो पुष्पगुच्छ स्वीकारताना विजयच्या हातातील अंगठी दिसत आहे. विजयने ती अंगठी रिंग फिंगरमध्येच घातलेली दिसत आहे. त्यावरून रश्मिका आणि विजय यांचा साखरपूडा झाल्याच्या बातम्या खऱ्या असल्याचं चाहते म्हणत आहेत.
View this post on Instagram
चाहत्यांनी विजय देवरकोंडाचे अभिनंदन केले
चाहत्यांनी विजयची अंगठी पाहिल्यानंतर विजयचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि त्याचे अभिनंदन केले आहेत. विजय आणि रश्मिका त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनंतरही एकत्र दिसले नाहीत. साखरपुड्यापूर्वी त्यांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले होते. पण अजूनही विजय आणि रश्मिका यांनी त्यांच्या साखरपुड्याबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही.
कामाबद्दल बोलायच झालं तर…
करिअरच्या आघाडीवर, विजय देवेराकोंडाचा “किंगडम” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. रश्मिका मंदानाचा “गर्लफ्रेंड” हा दक्षिण चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ती आयुष्मान खुरानासोबत “थामा” या बॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे.
