कलाकारांनी सिनेमात वापरलेल्या कपड्यांचं नंतर काय होतं?

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेत्री, अभिनेते हे नेहमी नव्या कपड्यांमध्ये दिसतात. त्यांचे कपडे रिपीट होत नाहीत. करिना कपूर, दीपिका पादुकोण, सोनम कपूर, आलिया भट्ट या काही अशा बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या वेगळ्या आणि आकर्षक अशा ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखल्या जातात. इतंकच नाही तर, करिना कपूर ही तिच्या सिनेमांमध्येही नेहमी स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात असते. ‘हीरोईन’ या सिनेमात …

कलाकारांनी सिनेमात वापरलेल्या कपड्यांचं नंतर काय होतं?

मुंबई : बॉलिवूडमधील अभिनेत्री, अभिनेते हे नेहमी नव्या कपड्यांमध्ये दिसतात. त्यांचे कपडे रिपीट होत नाहीत. करिना कपूर, दीपिका पादुकोण, सोनम कपूर, आलिया भट्ट या काही अशा बॉलिवूड अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या वेगळ्या आणि आकर्षक अशा ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखल्या जातात. इतंकच नाही तर, करिना कपूर ही तिच्या सिनेमांमध्येही नेहमी स्टायलिश दिसण्याच्या प्रयत्नात असते. ‘हीरोईन’ या सिनेमात करिना कपूरने 130 ड्रेस घालण्याचा एक एनोखा रेकॉर्डही बनवला आहे. तर धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने ‘देवदास’ या सिनेमात 30 किलोचा लेहंगा घातला होता. अलिकडे आलेल्या ‘रामलीला’ या सिनेमात दीपिकानेही 30 किलोचा लेहंगा घातला होता.

बॉलिवूड सिनेमांमध्ये कलाकार जे कपडे घालतात ते फॅशन होऊन जातं. त्यांचं बघून लोकही तसेच कपडे घालतात. तीच फॅशन फॉलो करतात. पण सिनेमांमध्ये अभिनेत्री, अभिनेते जे कपडे घालतात त्याचं नंतर काय होतं, याचा कधी विचार केला आहे का? चला तर जाणून घेऊया की, या इतक्या फॅशनेबल, भारी कपड्यांचं सिनेमानंतर काय होतं असेल…

कपड्य़ांचा लिलाव

अनेकदा सिनेमांमध्ये घातल्या जाणाऱ्या या कपड्यांचा लिलाव केला जातो. यातून मिळालेले पैसे हे दान केले जातात. ‘देवदास’ सिनेमात माधुरी दीक्षितने घातलेला हिरव्या रंगाचा लेहंगा 3 कोटी रुपयांमध्ये विकला गेला होता.

फॅन्स कपडे विकत घेतात

अनेकदा असे कपडे अभिनेत्री, अभिनेत्यांचे चाहते विकत घेतात. बॉलिवूड कलाकारांच्या चाहत्यांची देशात काही कमी नाही. चाहते त्यांच्या आवडत्या अभिनेत्री, अभिनेत्यांनी वापरलेल्या वस्तू मिळवण्यासाठी लाखो-करोडो रुपये खर्च करण्यासाठी तयार असतात. सलमान खानच्या एका चाहत्याने ‘मुझसे शादी करोगी’ या सिनेमाच्या एका गाण्यात सलमानने वापलेला टॉवेल दीड लाख रुपयांमध्ये विकत घेतला होता.

कलाकार आठवण म्हणून ठेवून घेतात

अनेकदा सिनेमात काम करणारे कलाकारच या कपड्यांना एक आठवण म्हणून ठेवून घेतात. सिनेमा निर्मातेही अगदी आनंदात त्यांना ते कपडे देतात. पण हे कपडे त्यांना आवडत असले तरी ते नेहमी हे कपडे घालत नाहीत, तर एक आठवण म्हणून या कपड्यांना जपून ठेवतात.

प्रोडक्शन हाऊसमध्ये ठेवले जातात

प्रत्येक कपड्याचा लिलाव होईलच असं नाही. त्यामुळे लिलाव न झालेले कपडे हे एका पेटीत बंद करुन ठेवले जातात. त्या पेटीवर त्या सिनेमाचं नाव लिहून प्रोडक्शन हाऊसमध्ये ते ठेवले जातात. त्यानंतर या कपड्यांना इतर सिनेमांमध्ये मिक्स मॅच करुन ज्युनिअर कलाकारांना घातले जातात. जेणेकरुन त्यांचा वापर व्हावा.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *