…म्हणून ‘सूर्यवंशम’ वारंवार सेट मॅक्सवर दाखवला जातो

मुंबई : बॉलिवूडचे शेहंशाह अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक सिनेमे केले. पण, त्यांचा ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा आपल्या आधीच्या आणि येणाऱ्या या दोन्ही पिढींना लक्षात राहिल. त्यामागे हा सिनेमा सुपरहीट असणे हे तर एक कारण आहेच. पण, या सिनेमाला अजरामर बनवण्यात आणखी कुणाचा खूपमोठा हात आहे. तो हात म्हणजे ‘सोनी मॅक्स’. 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे […]

...म्हणून ‘सूर्यवंशम’ वारंवार सेट मॅक्सवर दाखवला जातो
Follow us
| Updated on: May 21, 2019 | 9:40 PM

मुंबई : बॉलिवूडचे शेहंशाह अमिताभ बच्चन यांनी आजवर अनेक सिनेमे केले. पण, त्यांचा ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा आपल्या आधीच्या आणि येणाऱ्या या दोन्ही पिढींना लक्षात राहिल. त्यामागे हा सिनेमा सुपरहीट असणे हे तर एक कारण आहेच. पण, या सिनेमाला अजरामर बनवण्यात आणखी कुणाचा खूपमोठा हात आहे. तो हात म्हणजे ‘सोनी मॅक्स’. 20 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 21 मे रोजी ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. 20 वर्षांपासून ते आजपर्यंत हा सिनेमा जवळपास दररोज ‘सोनी मॅक्स’ या चॅनलवर दाखवला जातो.

हा सिनेमा ‘सोनी मॅक्स’वर इतक्यावेळा का दाखवला जातो? असा प्रश्न आपल्यालाअनेकदा पडला असेल. तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. याचं कारण म्हणजे ‘सोनी मॅक्स’ने या सिनेमाचे 100 वर्षांचे राईट्स विकत घेतले आहे. आता पर्यंत यामधील 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. होय… हा सिनेमा आणखी 80 वर्षांपर्यंत आपल्याला पाहावा लागणार आहे.

वारंवार ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा दाखवण्यामागे आणखी एक कारण आहे. हा सिनेमा 21 मे 1999 रोजी प्रदर्शित झाला होता. त्याचं वर्षी ‘सेट मॅक्स’ हे चॅनल लॉन्च झालं होतं. आता ‘सेट मॅक्स’ हे ‘सोनी मॅक्स’ झालं आहे.  ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा आणि सेट मॅक्स चॅनल हे दोन्ही एकाच वर्षी आले. दोन वर्षांपूर्वी सोनी मॅक्सची मार्केटिंग हेड वैशाली शर्मा हिने एका मुलाखतीत सांगितले होते, चॅनलने  ‘सूर्यवंशम’ या सिनेमाचे 100 वर्षांचे राईट्स विकत घेतले आहेत. त्यामुळे हा सिनेमा वारंवार दाखवला जातो.

‘सूर्यवंशम’ या सिनेमाबाबत काही खास गोष्टी

1997 ते 2000 पर्यंत ‘सूर्यवंशम’ च्या स्टोरी लाईनवर चार सिनेमे तयार झाले आहेत. पहिला सिनेमा 1997 मध्ये तामिळमध्ये सरथ कुमार आणि देवयानी यांच्या प्रमुख भूमिकेत तयार झाला. त्यानंतर 1998 मध्ये तेलुगुमध्ये दग्गुबाती वेंकटेश आणि मीना दुरईराज यांच्या प्रमुख भूमिकेत दुसरा सिनेमा बनला. तिसरा सिनेमा 1999 मध्ये अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘सूर्यवंशम’ नावाने प्रदर्शित झाला. तर चौथा सिनेमा 2000 मध्ये कन्नड भाषेत बनवण्यात आला. यामध्ये विष्णुवर्धन आणि ईशा कोप्पिकर प्रमुख भूमिकेत होते.

सौंदर्या आणि जयासुधा यांना रेखाचा आवाज

या सिनेमाचं दिग्दर्शन ईव्हीव्ही सत्यनारायण यांनी केलं होतं. या सिनेमात सौंदर्या आणि जयासुधा यांच्या आवाजासाठी डबिंग रेखाने केलं होतं. सूर्यवंशम हा सिनेमा 1997 मध्ये आलेल्या तामिळ सिनेमा ‘सूर्यवमसम’चा रिमेक होता. या सिनेमाचं शूटिंग गुजरात, हैद्राबाद आणि पोलोन्नारुवा, कॅन्डी श्रीलंकामध्ये झाली होती. बंगालमध्ये हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरली होती. कोलकाताच्या मेट्रो सिनेमामध्ये या सिनेमाने 100 दिवस पूर्म केले होते.

सौंदर्या रघुचा पहिला आणि शेवटचा हिन्दी सिनेमा

या सिनेमाची प्रमुख अभिनेत्री सौंदर्या रघु आता या जगात नाही. 17 एप्रिल  2004 रोजी बंगळुरुजवळ एका विमान दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. सौंदर्याने 1992 मध्ये ‘गंधरवा’ या सिनेमातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. तिने कन्नड, तेलुगू, तामिळ आणि मल्याळम भाषांमध्ये एकूण 100 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. सौंदर्याला 6 साउथ फिल्मफेयर अवॉर्ड मिळालेले आहेत. सूर्यवंशम हा सिनेमा सौंदर्या रघुचा पहिला आणि शेवटचा हिन्दी सिनेमा ठरला.

अमिताभ बच्चन यांचा डबल रोल असलेला ‘सूर्यवंशम’ हा सिनेमा 20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला. 7 कोटीमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने त्यावेळी 12 कोटी 65 हजारांचा गल्ला जमवला होता.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.