अरबाज-मलायका पुन्हा एकत्र?

मुंबई : बॉलिवूडचं नेहमी चर्चेत राहणारं जोडपं म्हणजे अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा. या दोघांचं लग्न हे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी लग्नांपैकी एक मानलं जायचं. मात्र गेल्या वर्षी तब्बल 18 वर्षांच्या लग्नातून त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांचा घटस्फोट झाला आणि हे आयडिअल कपल वेगळं झालं. तेव्हापासून ते आजवर हे दोघे एकत्र दिसले …

अरबाज-मलायका पुन्हा एकत्र?

मुंबई : बॉलिवूडचं नेहमी चर्चेत राहणारं जोडपं म्हणजे अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा. या दोघांचं लग्न हे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी लग्नांपैकी एक मानलं जायचं. मात्र गेल्या वर्षी तब्बल 18 वर्षांच्या लग्नातून त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दोघांचा घटस्फोट झाला आणि हे आयडिअल कपल वेगळं झालं. तेव्हापासून ते आजवर हे दोघे एकत्र दिसले नाहीत. मात्र आता हे दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.

अरबाज खान हा लवकरच टीव्हीवर दिसणार आहे. तो डान्स शोचा परिक्षक म्हणून प्रेक्षकांसमोर येतो आहे. या डान्स शोमध्ये त्यासोबत मलायकाही परिक्षक असणार आहे. त्यामुळे अरबाज-मलायका ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा सोबत पाहायला मिळणार आहे.

या डान्स रिअॅलिटी शोमध्ये ब्रेक अप थीम ठेवण्यात आली आहे. यामध्ये अशा जोड्या येणार आहेत, जे वेगळे झाले आहेत. या थीमला लक्षात ठेवूनच अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी या शोचे परिक्षण करावे अशी निर्मात्यांची इच्छा आहे. याबाबत अरबाज खानशी बोलणी झाली आहे,आता मलायका याबाबत होकार देणार का यासाठी निर्माते उत्सूक आहेत. या शोच्या माध्यमातून वेगळी झालेली जोडपी पुन्हा एकत्र यावी हे या शोचे उद्धेष्य आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मलायका आणि अभिनेता अर्जून कपूर यांच्या अफेअरच्या बातम्या फिरताहेत. इतकंच नाही तर या दोघांना अनेकदा सोबतही पाहण्यात आलं आहे. तर मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान हा जॉर्जिया एनदिर्यानीला डेट करत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *