दोन पत्नी, चार लेकर, आता तिसऱ्यांदा लग्न करणार कोट्यावधी संपत्तीचा मालक असलेला यूट्यूबर?, ‘तो’ व्हिडीओ…
अरमान मलिक हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अरमान मलिकची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अरमान मलिक हा आपल्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात सहभागी झाला होता. यावेळी त्याने मोठे खुलासे देखील केले.
युट्यूबर अरमान मलिक हा कायमच चर्चेत असतो. अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी बिग बॉस ओटीटी 3 मध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी अनेकांनी अरमान मलिक याच्यावर जोरदार टीका देखील केली. विशेष म्हणजे अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिक ही चक्क शेवटपर्यंत बिग बॉसच्या घरात दिसली. अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतात. खासगी आयुष्याबद्दल व्लॉगच्या माध्यमातून कायमच ते सर्व अपडेट शेअर करताना दिसतात. अरमान मलिक हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. आपल्या संपत्तीबद्दल त्याने थेट खुलासा देखील केला.
अरमान मलिक याने काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, माझी 200 कोटी संपत्ती आहे. यासोबत अरमान मलिक याच्याकडे अनेक आलिशान फ्लॅट देखील आहेत. अरमान मलिक आणि त्याच्या पत्नींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठा पैसा कमावला आहे. अरमानच्या पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक आहे.
पायल हिच्यासोबत घटस्फोट न घेताच अरमान मलिक याने कृतिका हिच्यासोबत दुसरे लग्न केले. पायल मलिक हिला दोन मुले आणि एक मुलगी आहे. कृतिकाला एक मुलगा आहे. विशेष म्हणजे सर्वजण एकाच घरात राहतात. आता अरमान मलिक याने थेट त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केले. अरमान मलिक याचे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये अरमान मलिक हा एक महिलेसोबत बोलताना दिसतोय. यावेळी अरमान मलिक हा म्हणतो की, तू कालच मला म्हटले की, तुझ्यासोबत लग्न करते. यावर ती महिला म्हणते की, नाही तुझे दोन लग्न अगोदरच झाले असल्याने मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. अरमान मलिक म्हणाला की, दोन लग्न झाले म्हणजे काय झाले.
यानंतर ती महिला समोर उभा असलेल्या तहलका म्हणते की, मी यांच्यासोबत लग्न करते. यावर अरमान मलिक हा म्हणतो की, याचेही लग्न झाले आहे. यावेळी ती महिला हैराण होताना दिसत आहे. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. मात्र, अरमान मलिक हा खरोखरच तिसरे लग्न करत नाहीये, तो फक्त आणि फक्त मजाक करत आहे. तरीही लोक हे अरमान मलिक याच्यावर टीका करताना दिसत आहेत.