मॅनेजरने वेश्या म्हटलं, झरीन खानची पोलिसात धाव

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतलेली अभिनेत्री झरीन खान सध्या एका वादामुळे चर्चेत आहे. झरीनने तिच्या एक्स मॅनेजर अंजली अथविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पैशांच्या कारणावरून अंजली अथने झरीनशी अपमानास्पद वागणूक केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं झरीनने या तक्रारीत म्हटलं आहे. झरीनने आपल्या वकिलासोबत गुरुवारी मुंबईतील खार …

Zarine Khan, मॅनेजरने वेश्या म्हटलं, झरीन खानची पोलिसात धाव

मुंबई : बॉलिवूडचा ‘दबंग’ सलमान खानसोबत ‘वीर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतलेली अभिनेत्री झरीन खान सध्या एका वादामुळे चर्चेत आहे. झरीनने तिच्या एक्स मॅनेजर अंजली अथविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पैशांच्या कारणावरून अंजली अथने झरीनशी अपमानास्पद वागणूक केली. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं झरीनने या तक्रारीत म्हटलं आहे. झरीनने आपल्या वकिलासोबत गुरुवारी मुंबईतील खार पोलीस ठाण्यात अंजली अथ विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आयपीसी कलम 509 अंतर्गत तक्रार दाखल करत, या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

अंजली अथ ही 3 ते 4 महिने झरीनची मॅनेजर होती, झरीनसाठी काम करत असताना दोघींमध्ये पैशांवरून वाद सुरू झाला. त्यानंतर दोघींनी एकमेकींना याबाबत अनेक मेसेजही केले. याच दरम्यान अंजलीने झरीनला वादग्रस्त मेसेज करत तिला वेश्या म्हटले, असे झरीनने तक्रारीत सांगितले. दरम्यान झरीनने पोलिसांना नेमके काय पुरावे दिले याबाबत संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही.

झरीनने 2010 साली आलेल्या वीर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती सलमान खान सोबत मुख्य भूमिकेत होती, मात्र हा चित्रपट फार काही चालला नाही. त्यानंतर झरीन खानने हाऊसफुल्ल-2, अक्सर-2, हेट स्टोरी-3, 1921, वजह तुम हो इत्यादी चित्रपटांत काम केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *