गुजरातमध्ये 50 हजार रुपयात अल्पवयीन मुलीची विक्री, 35 वर्षाच्या व्यक्तिसोबत लग्न

अहमदाबाद : गुजरातमधील बनासकांठामध्ये एका नराधम बापाने 10 वर्षीय मुलीची चक्क 50 हजार रुपयांसाठी व विकले आहे. तसेच मुलीच्या बापाने तिचे 35 वर्षीय व्यक्तिसोबत तिचे लग्न लावून दिले आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी करत आहेत. या मुलीच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर …

Father minor girl sold in gujrat, गुजरातमध्ये 50 हजार रुपयात अल्पवयीन मुलीची विक्री, 35 वर्षाच्या व्यक्तिसोबत लग्न

अहमदाबाद : गुजरातमधील बनासकांठामध्ये एका नराधम बापाने 10 वर्षीय मुलीची चक्क 50 हजार रुपयांसाठी व विकले आहे. तसेच मुलीच्या बापाने तिचे 35 वर्षीय व्यक्तिसोबत तिचे लग्न लावून दिले आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून अधिक चौकशी करत आहेत.

या मुलीच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे ही घटना पोलिसांसमोर आली आहे. मुलीची खरेदी करणारा व्यक्ती असारवा येथे राहणार आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तातडीने पोलिसांनी 15 ऑक्टोबर रोजी कारवाई करत मुलीची सुटका केली.

अल्पवयीन मुलीला कुबेरनगर क्षेत्रातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या तिला महिला संरक्षण गृह येथे ठेवले आहे, असं महिला क्राईम ब्रँच एसीपी केएम जोसेफ यांनी सांगितले.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 35 वर्षाच्या व्यक्तिची ओळख पटलेली आहे. या व्यक्तिचे नाव गोविंद ठाकोर आहे. हा तरुण भारतीय पद्धतीने अल्पवयीन मुलीसोबत ल्गन करत आहे. तसेच तिच्या डोक्यात कुकूं लावताना दिसत आहे.

दरम्यान, दोन महिन्यापूर्वीच गोविंद ठाकोर याने या मुलीला विभागाील जत्रेत पाहिले होते. त्याचवेळी त्याने या मुलीला खरेदी करण्याची तयारी दाखवली होती. एजंटच्या मदतीने त्याने मुलीला खरेदी केले होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *