केरळमध्ये आयसीसचे 15 दहशतवादी घुसले, गुप्तचर यंत्रणेकडून हायअलर्ट जारी

केरळ : केरळच्या किनारपट्टीवर आयसीस (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या हालाचाली वाढत आहे. नुकतंच केरळमध्ये 15 दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यानंतर केरळसह संपूर्ण भारतात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंका बॉम्बस्फोटानंतर केरळमध्ये गुप्तचर यंत्रणेकडून सातत्याने अलर्ट करण्यात येत होते. मात्र शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी लक्षद्वीमार्गे केरळ किनारपट्टीवर एक बोट पाहिली. …

, केरळमध्ये आयसीसचे 15 दहशतवादी घुसले, गुप्तचर यंत्रणेकडून हायअलर्ट जारी

केरळ : केरळच्या किनारपट्टीवर आयसीस (ISIS) या दहशतवादी संघटनेच्या हालाचाली वाढत आहे. नुकतंच केरळमध्ये 15 दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. यानंतर केरळसह संपूर्ण भारतात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंका बॉम्बस्फोटानंतर केरळमध्ये गुप्तचर यंत्रणेकडून सातत्याने अलर्ट करण्यात येत होते. मात्र शनिवारी मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी लक्षद्वीमार्गे केरळ किनारपट्टीवर एक बोट पाहिली. या बोटीत 15 दहशतवादी असल्याचा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. या संशंयानंतर गुप्तचर यंत्रणांनी केरळ पोलिसांना किनारपट्टीवरील सुरक्षेत वाढ करण्याचा आदेश दिले आहे. तसेच संपूर्ण भारतात हाय अलर्टही जारी करण्यात आला आहे.

याप्रकरणी केरळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत, किनारपट्टी भागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ पोलिसांची एक टीमही किनारपट्टीजवळ तैनात करण्यात आली आहे. त्याशिवाय किनारपट्टीवर मासेमारीसाठी येणाऱ्या प्रत्येक मच्छिमाराचीही कसून चौकशी केली जात आहे.

गेल्या महिन्यात 21 एप्रिलला श्रीलंकेत भीषण साखळी स्फोट झाला होता. या साखळी स्फोटात 350 नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर श्रीलंकन आर्मीकडून 15 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. हे सर्व दहशतवादी आयसिसचे या दहशतवादी संघटनेचे असल्याचं सांगितलं जात होतं.

त्यानंतर केरळमध्ये काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेने पालक्काड येथून 29 वर्षीय तरुणाला अटक केली  होती. या तरुणाचा श्रीलंका हल्ल्याप्रमाणे केरळमध्ये स्फोट घडवण्याचा कट होतो.

संबंधित बातम्या :

VIDEO : श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटाचा महाभयंकर व्हिडीओ समोर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *