निर्भया बलात्कार प्रकरण : आरोपींची फाशीवर अनिश्चित काळासाठी स्थगिती, पटियाला कोर्टाचा निर्णय

देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी पुन्हा टळली (nirbhaya rape case) आहे. पटियाला कोर्टाकडून फाशीवर स्थगिती देण्यात आली आहे.

निर्भया बलात्कार प्रकरण : आरोपींची फाशीवर अनिश्चित काळासाठी स्थगिती, पटियाला कोर्टाचा निर्णय
Follow us
| Updated on: Jan 31, 2020 | 6:12 PM

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांची फाशी पुन्हा टळली (nirbhaya rape case) आहे. दिल्ली कोर्टाने या फाशीवर स्थगिती दिली आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांच्या फाशीवर अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आली आहे. पुढच्या आदेशापर्यंत ही फाशी रद्द करण्यात आली आहे, असे दिल्ली कोर्टाने म्हटलं आहे. दुसऱ्यांदा अशाप्रकारे निर्भया बलात्कारांच्या फाशीवर स्थगिती देण्यात आली आहे.

दोषी आरोपी विनय शर्माने फाशीला स्थगितीची मागणी करणारी याचिका पटियाला हाऊस कोर्टात केली आहे. राष्ट्रपतींकडे दया याचिका प्रलंबित असल्याने, फाशीला स्थगिती द्यावी असं विनय शर्माचं म्हणणं आहे. तर आणखी एक दोषी आरोपी पवनने अल्पवयीन असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पवनची ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे.

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना शनिवारी 1 फेब्रुवारीला फासावर लटकवलं जाणार होतं. या प्रकरणातील चारही दोषींना शनिवारी सकाळी 6 वाजता फासावर लटकवण्यात येणार होतं. मात्र पटियाला कोर्टाकडून फाशीवर स्थगिती देण्यात आली (nirbhaya rape case) आहे.

आरोपींना वेगवेगळी फाशी नाही 

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना वेगवेगळी फाशी देण्यात येणार नाही, असे सुनावणीदरम्यान वकील वृंदा ग्रोवर यांनी सांगितले आहे. नियमानुसार, कोणत्याही एका प्रकरणी दोषींना वेगवेगळी फाशी दिली जात नाही. जोपर्यंत सर्व दोषींच्या याचिकांवर सुनावणी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही आरोपींना फाशी दिली जात नाही.

वकील वृंदा ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1981 मधील एका प्रकरणात 3 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणी 2 आरोपींनी राष्ट्रपतींकडे दया याचिकेची मागणी केली होती. त्यावेळी राष्ट्रपतींनी त्या दोन आरोपींना माफ केलं होतं. मात्र या प्रकरणातील एका आरोपीची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली होती आणि त्यानंतर त्या आरोपीला फाशी देण्यात आली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने कोणत्याही प्रकरणातील दोषींना एकत्र फाशी देण्यात येईल असे स्पष्ट केलं होतं.

फाशीच्या काही तासांपूर्वी पवन गुप्ताची सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका

निर्भया प्रकरणातील आरोपी अक्षय ठाकूरची दया याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर आता आरोपी पवन गुपताने फाशीच्या काही तासांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुन्ह्यावेळी अल्पवयीन असल्याच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलं होतं, पवन गुप्ताने या निर्णयावर पुर्नविचार याचिका दाखल केली आहे. तसेच, डेथ वॉरंटला रद्द करण्याची मागणीही केली आहे. यापूर्वी 20 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने पवन गुप्ताच्या याचिकेला फेटाळलं.

एकाच वेळी चौघांनाही फाशी

यापूर्वी 22 जानेवारीला सकाळी सात वाजता निर्भयाचे चारही मारेकरी फासावर लटकवलं जाणार होतं. मात्र त्यानंतर दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यांकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली (Death penalty to accused of nirbhaya rape case) होती. त्यानुसार अक्षय ठाकूर (31), पवन गुप्ता (25), मुकेश सिंह (32) आणि विनय शर्मा (26) नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं. या डेथ वॉरंटनुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली जाईल असा निर्णय दिल्ली कोर्टाने दिला होता.

जेल नंबर तीनमध्ये चौघाही दोषींना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशातील जल्लाद चौघांना एकामागून एक फासावर लटकवेल. या कुटुंबात पिढ्यान् पिढ्या हेच काम केले जाते. मात्र, निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवणारी व्यक्ती पहिल्यांदाच जल्लाद म्हणून काम करणार आहे.

निर्भया बलात्कार प्रकरण

16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.