चंद्रपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक, पीडित गर्भवती मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु

बल्लारपूर शहरातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करण्यात आला (Boy molestation on minor girl) आहे.

चंद्रपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोघांना अटक, पीडित गर्भवती मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु

चंद्रपूर : बल्लारपूर शहरातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करण्यात आला (Boy molestation on minor girl) आहे. त्यातून ती गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बल्लारपूर पोलिसात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पीडितेवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या प्रकरणातील आरोपी राजेश भैनवाल (21) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच गुन्ह्यात मदत केल्याप्रकरणी आरोपीच्या बहिणीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बल्लारपूर शहरातील टेकडी भागातील रहिवासी असलेल्या आरोपीने शेजारील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. पण, आरोपीने पीडिता आणि तिच्या आई-वडिलांना धाक दाखवून हा गंभीर प्रकार समोर येऊ दिला नाही. याबाबतची माहिती शेजारील नागरिकांनी मिळाली. त्यानंतर याच वॉर्डातील शेजारील नागरिकांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पण, घटनास्थळी आरोपी आणि पीडित मुलगी किंवा तिचे आई-वडील सापडले नाही. त्यानंतर पोलिसांनी चंद्रपूर महानगर गाठून रय्यतवारी वसाहत परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले. सध्या पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *