सांगलीकरांना मोठा दिलासा, 26 पैकी 22 जण कोरोनामुक्त

राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना सांगलीकरांना (Corona patient recover in Sangali) मोठा दिलासा मिळाला आहे. सांगलीत 26 पैकी 22 जणांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे.

सांगलीकरांना मोठा दिलासा, 26 पैकी 22 जण कोरोनामुक्त

सांगली : राज्यभरात कोरोनाचं थैमान सुरु असताना सांगलीकरांना (Corona patient recover in Sangali) मोठा दिलासा मिळाला आहे. सांगलीत आतापर्यंत 26 कोरोनाबाधित रुग्ण असल्याचं समोर आलं होतं. मात्र, यापैकी 22 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची आनंदाची बातमी आज समोर आली आहे. या 22 रुग्णांच्या दोन्ही टेस्टचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे. सांगलीचे सिव्हिल सर्जन डॉ. संजय साळुंखे यांनी याबाबत माहिती दिली आहे (Corona patient recover in Sangali).

दरम्यान, 26 पैकी 22 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 वर आली आहे. या 22 कोरोनामुक्त रुग्णांना लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. मात्र, नियमानुसार त्यांना काही दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना ही एक सकारात्मक घटना घडली आहे. याशिवाय यामुळे जनमानसात कोरोनाबाबतची भीतीदेखील कमी होण्यास मदत होणार आहे.

मात्र, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज (9 एप्रिल) राज्यात 162 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 297 वर पोहोचली आहे. यात मुंबई, ठाणे आणि पुण्यातील कोरोना रुग्ण हे धक्कादायक रित्या वाढताना दिसत आहे.

कोरोना विषाणूने देशासह राज्यात हाहा:कार पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 1 हजार 297 वर पोहोचला आहे.

आज मुंबईत 143 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर त्यापाठोपाठ पुणे 3, पिंपरी चिंचवड 2, यवतमाळ 1, अहमदनगर 3, ठाणे 1, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 4, मिरा-भाईंदर 1, वसई विरार 1, सिंधुदुर्ग 1 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

 • मुंबई – 143
 • पुणे – 03
 • पिंपरी चिंचवड – 02
 • यवतमाळ – 01
 • औरंगाबाद 03
 • ठाणे 01
 • नवी मुंबई 02
 • कल्याण-डोंबिवली 04
 • मीरा-भाईंदर 01
 • वसई विरार 01
 • सिंधुदुर्ग 01
 • एकूण : 162

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत दररोज 60 ते 100 रुग्णांची वाढ होत आहे. आज मुंबईत 143 रुग्ण वाढले असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही 857 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी कोरोना हा चिंतेचे विषय बनला आहे. त्यामुळे सर्वांनी घरीच थांबा घराबाहेर पडू नका असे आवाहन प्रशासनातर्फे केले आहे.

आतापर्यंत ताजी आकडेवारी पाहा

Edit
जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 857 20 45
पुणे- पिंपरी चिंचवड (शहर+ग्रामीण) 204 18 10
ठाणे मंडळातील इतर मनपा (पनवेल, वसई विरार, पालघर, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई इ.) 104 3 11
सांगली 26 4
अहमदनगर 28 3
नागपूर 19 5 1
औरंगाबाद 16 5 1
लातूर 8
बुलडाणा 8 1 1
यवतमाळ 5 3
सातारा 5 1
उस्मानाबाद 4 1
कोल्हापूर 2
रत्नागिरी 4
जळगाव 2 1
नाशिक 2 1
वाशिम 2
सिंधुदुर्ग 2
गोंदिया 1
अमरावती 1 1
अकोला 1
बीड 1
जालना 1
उल्हासनगर 1
इतर राज्य (गुजरात) 2
एकूण 1297 117 73
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *