नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं 30 लाखांचं कफ सिरप जप्त

मुंबई : नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं तब्बल 30 लाख रुपयांचं कफ सिरप मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलं. मरिन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान परिसरातून पोलिसांनी कफ सिरपच्या बाटल्यांनी भरलेला टेम्पो ताब्यात घेतला.  या टेम्पोमध्ये एकूण 30 लाख रुपयांचं नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं कफ सिरप होतं. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या […]

नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं 30 लाखांचं कफ सिरप जप्त
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

मुंबई : नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं तब्बल 30 लाख रुपयांचं कफ सिरप मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलं. मरिन लाईन्स येथील बडा कब्रिस्तान परिसरातून पोलिसांनी कफ सिरपच्या बाटल्यांनी भरलेला टेम्पो ताब्यात घेतला.  या टेम्पोमध्ये एकूण 30 लाख रुपयांचं नशा करण्यासाठी वापरण्यात येणारं कफ सिरप होतं. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुजरातहून मोठ्या प्रमाणात ‘कोडेन फॉस्फेट’ या सिरपचा साठा मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली. हे कफ सिरप नशा करण्यासाठी वापरलं जातं. या माहितीच्या आधारे पथकाच्या अधिकाऱ्यांनी तपास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे युनिटने मरिन लाइन्स येथील बडा कब्रिस्थान येथून या कफ सिरपने भरलेला एक टेम्पो ताब्यात घेतला. या प्रकरणी वीरेंद्र सिंग, अझहर जमाल सय्यद, यशपाल गोपाल सिंग, सर्वर मोहम्मद शेख या चौघांना अटक करण्यात आली आहे. यापैकी दोघे हा टेम्पो गुजरातहून घेऊन आले होते. तर इतर दोघे या कफ सिरपची खरेदी करण्यासाठी आले होते.

पोलिसांनी हा टेम्पो तसेच टेम्पोमध्ये लपवण्यात आलेल्या 5,760 कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. अटक करण्यात आलेले हे आरोपी कपड्यात लपवून बाटल्यांची तस्करी करत असल्याचं कारवाईत समोर आलं आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींना न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.