त्सुनामीमुळे इंडोनेशियात 43 जणांचा मृत्यू तर 600 जखमी

जकार्ता : इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 600 लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मृतांचा आखडा आणखी वाढण्याची भीती आहे. रविवारी इंडोनेशियाच्या ज्वालामुखी द्वीप भागात समुद्राखाली ज्वालामुखीचा विस्फोट झाल्याने ही त्सुनामी आली असल्याचे सांगितलं जात आहे. जगातील सर्वाधिक भूकंप आणि त्सुनामी इंडोनेशियामध्ये होतात. या त्सुनामीमुळे शनिवारी रात्री काही समुद्रकिनाऱ्यावरील […]

त्सुनामीमुळे इंडोनेशियात 43 जणांचा मृत्यू तर 600 जखमी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM

जकार्ता : इंडोनेशियामध्ये त्सुनामीमुळे 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 600 लोक गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मृतांचा आखडा आणखी वाढण्याची भीती आहे. रविवारी इंडोनेशियाच्या ज्वालामुखी द्वीप भागात समुद्राखाली ज्वालामुखीचा विस्फोट झाल्याने ही त्सुनामी आली असल्याचे सांगितलं जात आहे. जगातील सर्वाधिक भूकंप आणि त्सुनामी इंडोनेशियामध्ये होतात.

या त्सुनामीमुळे शनिवारी रात्री काही समुद्रकिनाऱ्यावरील घरं आणि इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती इंडोनेशिया सरकरकडून देण्यात आली आहे. मेट्रोलॉजी जियो फिजिक्स एजन्सीच्या माहितीनुसार, या त्सुनामीचे कारण समुद्राखाली पाण्यात ज्वालामुखीचा मोठा विस्फोट झाल्याने स्तुनामीचा फटका इंडोनेशियाला बसला आहे. या द्वीपचे निर्माण क्राकाटाओ ज्वालामुखीच्या लावांपासून तयार झाले आहे असे काही तज्ञांचे मत आहे. नुकतेच या ज्वालामुखीचा ऑक्टोबर महिन्यात विस्फोट झाला होता.

प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, समुद्रापासून 15 ते 20 मीटर उंच लाठ येत होती. सध्या द्वीपवर बचाव कार्य सुरु आहे. याचवर्षी सुलवेसू द्वीपमध्ये आलेल्या भूकंपामुळे एकूण 800 लोकांचा मृत्यू झाला होता.

सर्वाधिक भूकंप आणि त्सुनामी इंडोनेशियामध्ये का येतात?

जगात सक्रिय ज्वालामुखी जास्त प्रमाणात इंडोनेशियामध्ये आहेत. यामुळे इथे रिंग ऑफ फायर किंवा आगीचा गोळा बोललं जाते. या क्षेत्रात नेहमी भूकंप आणि त्सुनामी येते.  2004 मध्ये आलेल्या त्सुनामीमुळे तब्बल सव्वा दोन लाख लोक मारले गेले होते. हिंदी महासागरात या त्सुनामीने मोठी हाणी केली होती.

Non Stop LIVE Update
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.