दमदार आज्जी : 68 व्या वर्षी खामगाव ते वैष्णोदेवीपर्यंत सायकलवरुन प्रवास

सोशल मीडियावर एका सायकलवाल्या आजींचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लोक सध्या या आजींच्या दृढ इच्छाशक्तीला सलाम करत आहेत.

दमदार आज्जी : 68 व्या वर्षी खामगाव ते वैष्णोदेवीपर्यंत सायकलवरुन प्रवास

मुंबई : सोशल मीडियावर एका सायकलवाल्या आजींचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लोक सध्या या आजींच्या दृढ इच्छाशक्तीला सलाम करत आहेत. सर्वांना प्रश्न पडला असेल की या आजींनी नेमकं काय केलं आहे. सर्वजण त्यांचं कौतुक का करत आहेत. त्याला कारणही तसं खास आहे. (68 year old Rekha Devbhankar plans to travel vaishnodevi on cycle from Khamgaon maharashtra)

या आजी महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव ते जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिरापर्यंत सायकलवरुन जाणार आहेत. त्यांनी प्रवासाला सुरुवातदेखील केली आहे. या वयात त्यांनी इतकं मोठं आव्हान पार करण्याचा निश्चय केल्याचं पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.

या आजींचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये ही वृद्ध महिला एका जुन्या सायकलसह दिसत आहे. या आजी महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. Rekha Devbhankar असं या आजींचं नाव आहे.

त्यांच्याशी बातचित केल्यानंतर समजलं की, त्यांना वैष्णोदेवी मातेचं दर्शन करायचं आहे. परंतु त्यांची ही वैष्णोदेवीची यात्रा सामान्य भक्तांपेक्षा वेगळी आहे. कारण त्या खामगावपासून वैष्णोदेवी मंदिरापर्यंत सायकलवरुन निघाल्या आहेत. या वयात त्या 2200 किलोमीटरचं अंतर सायकलवरुन पार करणार आहेत. त्यासाठी त्यांनी प्रवासाला सुरुवात केली आहे. गरजेचं सर्व साहित्य त्यांनी सायकलवर बांधलं आहे.

Ratan Sharada या ट्विटर अकाऊंटवरुन आजींचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 37 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच या व्हिडीओला पाच हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. सायकलवाल्या आजींचा हा व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या

‘हत्ती’योग महागात पडला, रामदेव बाबा कोसळले, व्हिडीओ व्हायरल

रस्त्याने चालताना समोर अचानक ‘माऊंटेन लायन’, 6 मिनिटांपर्यंत चाललेल्या पाठलागाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

Photo : कोरोनाकाळात फूड रेसिपी व्हायरल, तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता

(68 year old Rekha Devbhankar plans to travel vaishnodevi on cycle from Khamgaon maharashtra)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *