96 वर्षीय आजी परीक्षेत टॉपर, संगणक बक्षीस

तिरुअनंतपुरम : केरळच्या ‘अक्षरलक्ष्यम’ साक्षरता कार्यक्रमांतर्गत झालेल्या परीक्षेत 96 वर्षीय आजीने 100 पैकी 98 टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला होता. कार्तियानी अम्मा असं या आजीचं नाव आहे. आता केरळ सरकारने या आजीला बक्षीस म्हणून नवीन लॅपटॉप दिला आहे. काही दिवसांपूर्वी कार्तियानी अम्माने संगणक शिकण्याची इच्छा बोलून दाखवली होती. या 96 वर्षीय आजीच्या अभूतपूर्व यशामुळे केरळ …

, 96 वर्षीय आजी परीक्षेत टॉपर, संगणक बक्षीस

तिरुअनंतपुरम : केरळच्या ‘अक्षरलक्ष्यम’ साक्षरता कार्यक्रमांतर्गत झालेल्या परीक्षेत 96 वर्षीय आजीने 100 पैकी 98 टक्के मिळवत पहिला क्रमांक पटकावला होता. कार्तियानी अम्मा असं या आजीचं नाव आहे. आता केरळ सरकारने या आजीला बक्षीस म्हणून नवीन लॅपटॉप दिला आहे. काही दिवसांपूर्वी कार्तियानी अम्माने संगणक शिकण्याची इच्छा बोलून दाखवली होती.

या 96 वर्षीय आजीच्या अभूतपूर्व यशामुळे केरळ सरकारच्या शिक्षणमंत्री रवींद्रनाथ यांनी बुधवारी अलपुझा जिल्ह्याच्या चेप्प्ड या गावात जाऊन कार्तियानी अम्माला नवीन लॅपटॉप दिला.

‘अक्षरलक्ष्यम’ साक्षरता परीक्षेत पहिला क्रमांक मिळवल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं होतं की, तुम्ही 96 वर्षीय वयात संगणक शिकू इच्छिता का? त्यावर “कुणी मला संगणक देत असेल तर नक्की शिकेन.” असं उत्तर दिलं होतं.”  या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्र्यांनी कार्तियानी अम्माला संगणक दिला.

यावेळी कार्तियानी अम्माने केरळच्या पारंपारीक साडी परिधान करत हा संगणक स्वीकारला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *