सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी आदित्य ठाकरे?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नुकताच महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये त्यांनी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह तरुणांनाही मंत्रिपदाची संधी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी आदित्य ठाकरे?

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नुकताच महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये त्यांनी तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह तरुणांनाही मंत्रिपदाची संधी दिली. यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray guardian minister of sindhudurg) यांचीही कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. यानंतर आदित्य ठाकरेंच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. त्यांना कोणते खाते मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.त्यातच आता नव्याने त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची (Aaditya Thackeray guardian minister of sindhudurg) जबाबदारी देखील सोपवली जाणार असल्याचे बोललं जात आहे.

सिंधुदुर्गातील आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे जिल्ह्यात ठाकरे सरकारवर नाराज असल्याचे बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात यंदा कोकणातून रत्नागिरी जिल्ह्यातील आमदार उदय सामंत यांना स्थान देण्यात आले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमदार दीपक केसरकर यांचा पत्ता कापण्यात आला. त्यामुळे सिंधुदुर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे प्राबल्य असूनही मंत्रिमंडळातील पाटी मात्र कोरी राहिली आहे. तब्ब्ल 25 वर्षानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. खरं तर जिल्ह्याला हक्काचे पालकमंत्री मिळणार अशी आशा असताना दीपक केसरकर यांचा पत्ता कापला गेला. पालकमंत्री कुणाला मिळणार यावर चर्चा सुरु असताना आता आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, कोकणाचा विचार करता आता नारायण राणे हे भाजपमध्ये बऱ्यापैकी स्थिरावले आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक निवडणुकीत राणेंनाही काहीसं यश मिळालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नारायण राणे यांचं कोकणात पुनरागमन होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यापार्श्वभूमिवरच आदित्य ठाकरेंकडे सिंधुदुर्गच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *