यवतमाळमध्ये एसीबीची मोठी कारवाई, पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यासह 5 जणांना रंगेहाथ अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यवतमाळमधील उमरखेड येथे मोठी कारवाई केली आहे (Bribe by Umarkhed Police). यात 5 जणांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

यवतमाळमध्ये एसीबीची मोठी कारवाई, पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यासह 5 जणांना रंगेहाथ अटक
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 11:54 AM

यवतमाळ : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यवतमाळमधील उमरखेड येथे मोठी कारवाई केली आहे (Bribe by Umarkhed Police). यात पोलिस उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी), पोलिस निरीक्षकांसह 5 जणांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. या कारवाईने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये उमरखेडचे डीवायएसपी, उमरखेड पोलीस निरीक्षक आणि एपीआय यांच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

तक्रारदाराने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तक्रार केल्यानंतर एसीबीने सापळा रचून या सर्वांना अटक केली. एसडीपीओ विकास शंकरराव तोटावार, पोलिस निरीक्षक संजय खंदाडे आणि सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत इंगोले, पोलिस हवालदार सुभाष किसनराव राठोड आणि पोलिस कॉन्स्टेबल शेख मुनिर शेख मेहबूब अशी या पाच आरोपींची नावं आहेत.

आरोपींनी तक्रारदारांवर दाखल असलेल्या गुन्हामध्ये आरोपपत्र दाखल न करता “ब” फायनल अहवाल पाठवला. यानंतर त्यांनी तक्रारदाराकडे प्रकरण मिटवण्यासाठी लाचेची मागणी केली. उमरखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय खंदाडे यांच्यासाठी निवृत्त पोलिस हवालदार सुभाष राठोड यांनी 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तसेच ठाणेदार आणि सरकारी वकिलांसाठी 10 हजार रुपयांची मागणी केली. यात पोलिस निरीक्षक संजय खंदाडे यांनी आपल्या कक्षामध्ये लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखवली. त्यांनी पोलीस हवालदार सुभाष राठोड यांच्या मार्फत लाच रक्कम स्वीकारण्यास मान्य केलं.

एपीआय श्रीकांत इंगोले यांनी तक्रारदारांवर दाखल असलेल्या दुसर्‍या गुन्ह्यात एसडीपीओ विकास तोटावार यांच्यासोबत चर्चा करुन संगममताने तक्रारदाराला मदत करण्यासाठी वारंवार लाचेची मागणी केली. तसेच एसडीपीओ विकास तोटावार यांनी दोन्ही गुन्ह्यात तक्रारदारास मदत करण्यासाठी काम करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी केली आणि लाच स्वीकारण्यास मान्य केलं. पोलिस कॉन्स्टेबल मुनीर यांनी तक्रारदारावर दाखल गुन्ह्यात एसडीपीओ तोटावार यांच्याशी लाच रक्कम संबंधाने बोलणी आणि मध्यस्थी करुन सहकार्य केले.

एसीबीच्या सापळा रचून केलेल्या कारवाईत पोलिस हवालदार सुभाष राठोड यांना संशय आल्यानं त्यांनी लाच रक्कम न स्वीकारता पळून जाण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चारही आरोपींना एसीबीने ताब्यात घेतलं आहे. एपीआय श्रीकांत इंगोले हे फरार आहेत. याप्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.

Bribe by Umarkhed Police

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.