देवदर्शनावरुन परतताना स्कॉर्पिओ गाडीची बंद ट्रकला धडक, 6 जणांचा मृत्यू

देवदर्शनावरुन परतत असताना भरधाव स्कॉर्पिओ गाडीने बंद ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात (Chandrapur accident) झाला. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

देवदर्शनावरुन परतताना स्कॉर्पिओ गाडीची बंद ट्रकला धडक, 6 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 20, 2020 | 8:46 AM

चंद्रपूर : देवदर्शनावरुन परतत असताना भरधाव स्कॉर्पिओ गाडीने बंद ट्रकला धडक दिल्याने भीषण अपघात (Chandrapur accident) झाला. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण जखमी झाले आहेत. चंद्रपुरातील मूल तालुक्यातील केसलाघाट या ठिकाणी भीषण अपघात झाला आहे. काल (19 फेब्रुवारी) रात्री 10.45 वाजता हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ येथील भोयर आणि पाटील कुटुंबीय देवदर्शानासाठी भंडारा जिल्ह्यातील प्रतापगड येथे गेले होते. रात्री उशिरा ही मंडळी परतत असताना भरधाव येत असलेल्या स्कार्पिओने नादुरुस्त ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यात चंद्रपूरच्या बाबूपेठ परिसरातील भोयर आणि पाटील कुटुंबातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि 2 वर्षांच्या लहान बालकाचाही समावेश आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील केसलाघाट ते नागाळा या दरम्यान हा अपघात झाला.

या अपघातात 6 जण जखमी झाले. जखमींना मूल तालुक्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहे.

अपघातातील मृत व्यक्तींची नावे

संभाजी भोयर (77) कुसुम भोयर (65) जियान भोयर (दीड वर्ष) दत्तू झोडे (50) मीनाक्षी झोडे (33) शशिकला वांढरे (65)

या अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या या अपघाताची चौकशी सुरु (Chandrapur accident) आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.