पायी घरी निघालेल्या 7 जणांना टेम्पोने उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर

विरारमध्ये या मजूरांची हीच घरी जाण्याची ओढ जीवावर बेतली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर पायी निघालेल्या 7 जणांना एका टेम्पोने उडवलं. या भीषण अपघात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला (Accident of labours amid corona LockDown).

पायी घरी निघालेल्या 7 जणांना टेम्पोने उडवलं, चौघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर

पालघर : कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाली. या दरम्यान होणारी ससेहोलपट टाळण्यासाठी अनेक मजूर आपल्या घराकडे निघाले आहेत. वाहनांना बंदी असल्याने हे मजूर पाईच प्रवास करत आहेत. विरारमध्ये या मजूरांची हीच घरी जाण्याची ओढ जीवावर बेतली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर पायी निघालेल्या 7 जणांना एका टेम्पोने उडवलं. या भीषण अपघात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत (Accident of labours amid corona LockDown).

देशात लॉकडाऊन असल्याने सर्वच प्रवासी वाहने बंद आहेत. त्यामुळे घराकडे निघालेल्या नागरिकांनी नाईलाजाने पायीच प्रवास सुरु केला आहे. अशाच पायी घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भीषण अपघात झाला. यात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण  गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व प्रवासी देशात संचारबंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात होते. गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आलं. परत वसईच्या दिशेने येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात  एका भरधाव वेगाने येणाऱ्या आयसार टेम्पोने यांना जोरदार धडक दिली.

या अपघातातील 2 जणांची ओळख पटली असून 5 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पेटलेल्यांपैकी एकाचं नाव कल्पेश जोशी (32) तर दुसऱ्याचं नाव मयांक भट (34) असं आहे.

संबंधित बातम्या :
Corona Live : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

देशभरात संचारबंदी, मुंबईतून हजारो कामगारांचा राजस्थानकडे पायी प्रवास

राज्यात एकाच वेळी 11 हजार कैद्यांना पॅरोल, जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या 10 गोष्टी

संबंधित व्हिडीओ :


Accident of labours amid corona LockDown

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *