वीरु देवगण खुर्चीवरुन कोसळले, काजोलच्या फोननंतर अजय देवगणची रुग्णालयाकडे धाव

मुंबई : बॉलिवूडमध्ये 80 पेक्षा जास्त सिनेमात अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम करणारे वीरु देवगण यांचं निधन झालं. प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचे ते वडील आहेत. अजय देवगणला घरातच अॅक्शन सीनचं बाळकडू देणाऱ्या वीरु देवगण यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली आणि देवगण कुटुंबीयांचं सांत्वन केलं. एका वृत्तानुसार, वीरु देवगण …

वीरु देवगण खुर्चीवरुन कोसळले, काजोलच्या फोननंतर अजय देवगणची रुग्णालयाकडे धाव

मुंबई : बॉलिवूडमध्ये 80 पेक्षा जास्त सिनेमात अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम करणारे वीरु देवगण यांचं निधन झालं. प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचे ते वडील आहेत. अजय देवगणला घरातच अॅक्शन सीनचं बाळकडू देणाऱ्या वीरु देवगण यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी त्यांच्या अंत्यविधीसाठी उपस्थिती लावली आणि देवगण कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

एका वृत्तानुसार, वीरु देवगण घरी जेवण करत असतानाच खुर्चीवरुन कोसळले. सून काजोलने त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं. पण हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. यावेळी अजय देवगण मुंबई फिल्म सिटीमध्ये तानाजी सिनेमाची शूटिंग करत होता. वडिलांच्या निधनाची बातमी मिळताच त्याने रुग्णालयाकडे धाव घेतली.

वीरु देवगण यांनी 1999 मध्ये हिंदुस्तान की कसम सिनेमाचं दिग्दर्शनही केलं होतं. आज का अर्जुन, राम तेरी गंगा मैली हो गई, विजयपथ, दिलजले, एक ही रास्ता, प्रेम रोग, आखरी रास्ता, सोने पे सुहागा, खून भरी मांग या सिनेमातील स्टंटचं दिग्जर्शन केलं होतं. स्टंट दिग्दर्शनाशिवाय त्यांनी अभिनेता, निर्माता आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं आहे.

क्रांती, सौरभ आणि सिंहासन या सिनेमात त्यांनी अभिनेता म्हणून काम केलं होतं. तर हिदुस्तान की कसम, दिल क्या करे आणि सिंहासन सिनेमाची निर्मिती केली होती. यासोबतच विश्वात्मा आणि मेरा पती सिर्फ मेरा है सिनेमात सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली होती. मुलगा अजय देवगणच्या जिगर सिनेमाचे ते लेखक होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *