कर्करोगाशी झुंज संपली; पीके, रॉक ऑन फेम अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे निधन

एमटीव्हीवरील 'स्प्लिट्सविला 4' (Splitsvilla Season 4) या कार्यक्रमामुळे साईप्रसादला प्रसिद्धी मिळाली होती. (Actor Sai Gundewar dies of Brain Cancer)

कर्करोगाशी झुंज संपली; पीके, रॉक ऑन फेम अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे निधन
Follow us
| Updated on: May 10, 2020 | 7:13 PM

न्यूयॉर्क : ‘पीके’, ‘रॉक ऑन’ यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये छोटेखानी भूमिका साकारलेला अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून मेंदूच्या कर्करोगाशी सुरु असलेली त्याची झुंज अखेर संपली. अमेरिकेत उपचारादरम्यान साईप्रसादची प्राणज्योत मालवली. (Actor Sai Gundewar dies of Brain Cancer)

साईप्रसाद गुंडेवार मूळ नागपूरचा होता. ‘ग्लायोब्लास्टोमा’ म्हणजेच मेंदूच्या कर्करोगाचे निदान झाल्यावर फेब्रुवारी 2019 मध्ये तो ऑपरेशनसाठी अमेरिकेतील लॉस अँजेलसला गेला होता. मात्र भारतीय प्रमाण वेळेनुसार आज (रविवार 10 मे) सकाळी 7.30 वाजता साईप्रसादने अखेरचा श्वास घेतला. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतल्याने त्याचे मित्रमंडळीही हळहळले आहेत.

एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला 4’ (Splitsvilla Season 4) या कार्यक्रमामुळे साईप्रसादला प्रसिद्धी मिळाली. या शोमधील अनोख्या लूकमुळे त्याला अनेक कार्यक्रमांच्या ऑफर मिळाल्या होत्या. साईप्रसाद गुंडेवारने अनेक इंग्रजी मालिका, बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. साई गुंडेवार या नावाने तो ओळखला जात होता.

‘रॉक ऑन’, ‘युवराज’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ अशा हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडपट आणि लघुपटांमध्ये त्याने भूमिका केल्या. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम’ या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे.

एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला 4’ (Splitsvilla Season 4), स्टार प्लस वाहिनीवरील ‘सर्वायव्हर’ (Survivor), अमेरिकेतील लोकप्रिय S.W.A.T., Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies, द कार्ड (The Card) या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

साईप्रसादने 2015 मध्ये फॅशन डिझायनर सपना अमीनशी लग्न केले होते. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे.  अवघ्या काही दिवसापूर्वी बॉलिवूडने इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यासारखे दोन मोहरे कर्करोगामुळे गमावले आहेत. त्यातच आणखी एक कलाकार काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (Actor Sai Gundewar dies of Brain Cancer)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.