प्रेक्षकांची पाठ, निर्माते ‘अग्निहोत्र 2’ गुंडाळणार

प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'अग्निहोत्र 2' ही मालिका (Aghanihotra 2 Tv serial) लवकरच गाशा गुंडाळणार आहे.

प्रेक्षकांची पाठ, निर्माते 'अग्निहोत्र 2' गुंडाळणार
Follow us
| Updated on: Feb 25, 2020 | 9:14 PM

मुंबई : प्रेक्षकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘अग्निहोत्र 2’ ही मालिका (Agnihotra 2 Tv serial) लवकरच गाशा गुंडाळणार आहे. दहा वर्षांपूर्वी या मालिकेच्या पहिल्या पर्वाला तुफान लोकप्रियता मिळाली होती.  त्याच पार्श्वभूमीवर नव्या कथेसह ‘अग्निहोत्र 2’ मालिका 2 डिसेंबर 2019 पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली. मात्र, प्रेक्षकांचा या नव्या पर्वाला प्रतिसाद न मिळाल्याने टीआरपीमध्ये ही मालिका मागे पडली. त्यामुळे निर्मात्यांनी ही मालिका बंद करण्याचा नर्णय घेतला.

‘अग्निहोत्र 2’चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात या मालिकेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या मालिकेच्या टीझरला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला. विशेष म्हणजे अभिनेते शरद पोंक्षे यांनी कर्करोगावर यशस्वीपणे मात करत या मालिकेमार्फत पुन्हा कलाविश्वात पुनरागमन केलं. त्यांनी अत्यंत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडली. मात्र, तरीही अखेर निर्मात्यांवर ही मालिका (Agnihotra 2 Tv serial) बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे.

‘अग्निहोत्र 2’ मालिकेचा शेवटचा भाग येत्या 9 मार्चला प्रसारित होणार आहे. त्यानंतर ‘वैजू नंबर 1’ ही मालिका सुरु होणार आहे. मालिका सुरु झाल्यानंतर दोन महिन्यातच ही मालिका बंद होत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे शरद पोक्षें, रश्मी अनपट, राजन भिसे यांसारख्या मातब्बर कलाकारांनी भूमिका साकारली. या कलाकारांनी मालिकेत अप्रितम कामही केलं. मात्र, तरीही प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवली.

दहा वर्षांपूर्वी ‘अग्निहोत्र’ मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होते. अग्निहोत्री कुटुंब, सात गणपतींचं रहस्य आणि त्यातील पात्र यांनी प्रेक्षकांना अक्षरश: भुरड घातली होती. त्यामुळे आजही ही मालिका अनेकांच्या स्मरणात आहे. ‘अग्निहोत्र’ मालिकेला मिळालेला प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी ही मालिका नव्या कथेसह पुन्हा सुरु केली. दोन्ही पर्वाची कथा श्रीरंग गोडबोल यांनी लिहिली. तर पहिल्या पर्वाचं दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं तर दुसऱ्या पर्वाचं दिग्दर्शन भीमराव मुडे यांनी केलं. मात्र, प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद या मालिकेला मिळाला नाही.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.