नगरमध्ये दाम्पत्याला विवस्त्र केल्याचा 'तो' व्हिडीओ खोटा, पोलिसांकडून खळबळजनक खुलासा

अहमदनगरला दाम्पत्याला विवस्र करुन मारहाणीचा व्हिडीओ प्रकरणी खळबळजनक सत्य समोर आलं (Ahmednagar rape victim Fake Video) आहे.

नगरमध्ये दाम्पत्याला विवस्त्र केल्याचा 'तो' व्हिडीओ खोटा, पोलिसांकडून खळबळजनक खुलासा

अहमदनगर : अहमदनगरला दाम्पत्याला विवस्र करुन मारहाणीचा व्हिडीओ प्रकरणी खळबळजनक सत्य समोर आलं (Ahmednagar rape victim Fake Video) आहे. अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी धक्कादायक खुलासा केला आहे. मारहाण झालेल्या दाम्पत्यानेच मित्रांच्या मदतीने स्वतः हा व्हिडिओ केल्याची खळबळजनक माहिती पोलिसांनी समोर आणली आहे.

मारहाण झालेल्या (Ahmednagar rape victim Fake Video) दाम्पत्यातील पीडित महिलेने 2016 साली सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील आरोपींकडून पैसे उकळण्यासाठी पती नारायण मतकरने मित्रांच्या मदतीने मारहाण केल्याचा बनावाट व्हिडिओ तयार केला.

विशेष म्हणजे बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पीडित महिलेचे कुटुंब जास्त पैसे मागत होते. मात्र आरोपी पैसे देत नसल्याने या पतीने आपल्या पत्नी आणि स्वतःचा  बनावट व्हिडीओ बनवला.अहमदनगर शहराच्या एका शाळेत हा व्हिडीओ बनवला होता.

याप्रकरणी पती-पत्नी सह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच यात  पोलिसांनी त्वरित तपास केल्या प्रकरणी पोलिसांना 10 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय? 

अहमदनगरमध्ये 2016 मध्ये पीडित विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाला होता. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. यात 6 आरोपींचा समावेश आहे. मात्र, 4 वर्षे होऊनही अद्याप या प्रकरणात आरोपपत्रही दाखल झालेलं नाही. विशेष म्हणजे बलात्कारातील हे आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहे.

या प्रकरणी गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित दाम्पत्याला विवस्त्र करुन अंगावर पेट्रोल टाकून अमानुष मारहाण झाल्याची घटना 2 मार्चला घडली होती. .या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. या प्रकरणी तक्रारही दाखल करण्यात आली होती.

नवरा-बायकोला विवस्त्र केलं, पेट्रोल टाकून अमानुष मारहाण, गुन्हा दाखल

24 जानेवारीला पीडित दाम्पत्य शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन घरी जात होते. तेव्हा त्यांचं रुग्णालयाच्या बाहेरच अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांना एका अज्ञातस्थळी बंदिस्त खोलीत विवस्त्र करण्यात आलं. त्यांच्याच कपड्यांच्या सहाय्याने त्यांना उलटं टांगून अमानुष मारहाण करण्यात आल्याचीही माहिती पीडितांनी दिली आहे.

यात पीडितांना विवस्त्र करुन त्यांचे हात मागे बांधल्याचं दिसत आहे. तसेच त्याचं तोंडही बंद करण्यात आलं होतं. संबंधित व्हिडीओत पीडितांना पट्ट्याने मारहाण होताना दिसत आहे. या प्रकरणानंतर पोलिसांकडून चौकशी सुरु (Ahmednagar rape victim Fake Video) होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *