ना शरद पवार, ना रोहित, ना सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या सत्काराला फक्त पत्नी आणि मुलगा

अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी (Ajit Pawar Baramati felicitation pawar family absent) करण्यात आली. या सर्व भव्य सत्कारासाठी पवारांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्ती गैरहजर होत्या.

ना शरद पवार, ना रोहित, ना सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या सत्काराला फक्त पत्नी आणि मुलगा
Follow us
| Updated on: Jan 10, 2020 | 7:34 PM

बारामती : राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बारामतीत दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले होते. त्याशिवाय बारामती शहरातून अजित पवार यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शहरातील शारदा प्रांगणात नागरी सत्कार झाला. यावेळी अजित पवारांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी (Ajit Pawar Baramati felicitation pawar family absent) करण्यात आली. या सर्व भव्य सत्कारासाठी पवारांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्ती गैरहजर होत्या.

अजित पवारांच्या सत्काराला पवार कुटुंबियांनी दांडी मारली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार यांसह अनेक दिग्गज नेते गैरहजर होते. या सत्कारासाठी फक्त अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा जय पवार असे दोन जण हजर (Ajit Pawar Baramati felicitation pawar family absent) होते.

अजित पवारांच्या सत्कारासाठी बारामती शहरासह गावातील लाखो कार्यकर्ते सहभागी झाले होते. असं असताना पवार कुटुंबिय मात्र या सत्कारासाठी हजर नव्हते. त्यामुळे शंका उपस्थित केली जात आहे.

या भव्य मिरवणुकीनंतर अजित पवारांनी सत्काराला उत्तर देणारं भाषण केलं. आजचा सत्कार हा आगळा वेगळा आहे. हा सत्कार माझा नाही तर बारामतीकरांचा आहे. आजच्या मिरवणुकीमुळे खूप आठवणी डोळ्यासमोरून गेल्या. माझे शाळेचे मित्र आज भेटले, असं अजित पवार म्हणाले. येत्या 16 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीत येणार आहेत. कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार असल्याची माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

जनतेने जनतेचं काम केलं, आता आपलं काम

ज्यांनी मला प्रचंड मतदान केलं, एवढं प्रेम दिलं त्या बारामतीकरांचा हा सत्कार आहे. मात्र आता काम करायचं आहे. गेल्या पाच वर्षात काम करता आले नाही. शहरासोबत जिल्ह्याची जबाबदारी आहे. जनतेनं जनतेचं काम केलं आहे. आता आपलं काम आहे. पाण्याचा प्रश्न आहे, तो सोडवायचा आहे, असं अजित पवार (Ajit Pawar Baramati felicitation pawar family absent) म्हणाले.

मराठी भाषा टिकली पाहिजे. यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करणार असेही अजित पवारांना सांगितले. पालखी महामार्ग चारपदरी करण्यासाठी भूसंपादन करण्याची गरज आहे. तसेच पुरंदर विमानतळाच्या बाबतीत विरोधक करणाऱ्यांचा विचार केला जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.