जयसिद्धेश्वरांना धक्का, अजित पवारांकडून पोटनिवडणुकीची तयारी, काँग्रेसचा उमेदवार उतरवणार

 सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांची खासदारकी जातीच्या दाखल्यामुळे अडचणीत आली आहे. (Ajit Pawar on Jay Siddheshwar Swamis caste certificate cancel)

जयसिद्धेश्वरांना धक्का, अजित पवारांकडून पोटनिवडणुकीची तयारी, काँग्रेसचा उमेदवार उतरवणार
Follow us
| Updated on: Feb 24, 2020 | 7:00 PM

मुंबई : सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांची खासदारकी जातीच्या दाखल्यामुळे अडचणीत आली आहे. जात पडताळणीत समितीने खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला रद्द केला आहे. जयसिद्धेश्वर यांची खासदारकी रद्द होते का? हे पुढच्या काही दिवसांमध्ये कळेलच. मात्र महाविकास आघाडीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आतापासूनच सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना यावर प्रतिक्रिया दिली. (Ajit Pawar on Jay Siddheshwar Swamis caste certificate cancel)

“जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जागेवर पोटनिवडणूक लढवली जाणार आहे. ही जागा पूर्वी काँग्रेसने लढवली होती. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांशी बोलावं लागेल. त्यांचे एकमत झाले तर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवेल”, असं अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar on Jay Siddheshwar Swamis caste certificate cancel)

जयसिद्धेश्वरांचा जातीचा दाखला रद्द

सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य यांचं जातवैधता प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने रद्द केले आहे. डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघाच्या  निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना बेडाजंगम जातीचा दाखला सादर केला होता. तो दाखला आता समितीने अवैध ठरविला आहे. त्यामुळे खासदार जयसिदेश्वर शिवाचार्य यांची खासदारकी आता धोक्यात आली आहे. गेल्या आठवड्यात या संदर्भात जातपडताळणी समितीने अंतिम सुनावणी घेतली होती. त्याचा अंतिम अहवाल आज तक्रारदारांना देण्यात आला.

लोकसभेच्या 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर राखीव लोकसभा मतदार संघातून  भाजपकडून डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य यांनी निवडणूक लढवली होती.  काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करत डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य हे विजयी झाले होते. मात्र खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी दाखल केलेला बेडा जंगम जातीचा जात वैधता दाखला बनावट असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे यांनी केली होती.

गायकवाड आणि मुळे यांच्या तक्रारीनुसार जातपडताळणी समितीने दक्षता पथक नियुक्त करण्यात आले होते, त्यात सर्व कागपत्रांची शहानिशा करून खासदारांनी दाखल केलेला बेडा जंगम प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आला आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र अनुसूचित जाती, जमाती विमुक्त जाती, इतर मागासप्रवर्ग व्यक्तींना प्रमाणपात्र देण्याचे आणि त्याच्या पडताळणीचे अधिनियम 2000  मधील कलमा 11 च्या कायद्यातील तरतुदीनुसार खासदार डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य यांच्या विरोधात अक्कलकोट तहसीलदारांना न्यायालयात लेखी तक्रार देण्याचे आदेश आले आहेत. शिवाय दाखला जप्त करण्याचेही आदेश दिले आहेत.

दरम्यान  जातीचादाखला अवैध ठरविल्यामुळे जयसिद्धेश्वर स्वामींची खासदारकी रद्द करून पोटनिवडणूक  घेण्याची मागणी तक्रारदारांकडून  करण्यात येणार आहे.

जातपडताळणी समितीने दिलेला निकाल हा मान्य नसेल तर त्यांना दाद मागण्याची  संधी देण्यात आली आहे. त्यामुळे जातपडताळणी समितीने दिलेल्या निकालाच्या  विरोधात आता उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे. त्यामुळे आता खासदार डॉ जयसिदेश्वर शिवाचार्यांच्या खासदारकीची सगळी मदार उच्च न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असेल.

निवडणूक अधिकाऱ्यावर कारवाई करा : प्रकाश आंबेडकर

सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महाराज कायद्याच्या प्रकियेमुळे 5 वर्ष खासदार राहतील. उमेदवारी अर्ज दाखल करताना आम्ही आक्षेप घेतला होता, परंतु अधिकाऱ्याने उमेदवारी अर्ज स्वीकारला. निवडणूक आयोगाने या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. कायद्यातील जटिल प्रकियेमुळे महाराजांना अभयदान मिळत आहे, असंही आंबेडकर म्हणाले.

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.