लाल साडी, कपाळावर कुंकू, अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमातील लूक रिलीज

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच आपला अक्षय कुमार हा वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे करण्यासाठी ओळखला जातो (Akshay Kumar Laxmmi Bomb). तो त्यांची प्रत्येक भूमिका उत्कृष्ट्यरित्या साकारतो. मग ती भूमिका विनोदी असो, भावनिक असो तो प्रत्येक भूमिकेत फीट होऊन जातो. आता अक्षयचा असाच एका वेगळ्या भूमिकेतील सिनेमा 'लक्ष्मी बॉम्ब' येतो आहे

लाल साडी, कपाळावर कुंकू, अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमातील लूक रिलीज

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच आपला अक्षय कुमार हा वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे करण्यासाठी ओळखला जातो (Akshay Kumar Laxmmi Bomb). तो त्यांची प्रत्येक भूमिका उत्कृष्ट्यरित्या साकारतो. मग ती भूमिका विनोदी असो, भावनिक असो तो प्रत्येक भूमिकेत फीट होऊन जातो. आता अक्षयचा असाच एका वेगळ्या भूमिकेतील सिनेमा ‘लक्ष्मी बॉम्ब’ येतो आहे (Akshay Kumar Laxmmi Bomb). या सिनेमाचं पोस्टर नुकतच समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये अक्षय तृतीयपंथी भूमिकेत दिसत आहे. यामध्ये अक्षयने लाल रंगाची साडी नेसली आहे, कपाळावर कुंकू लावलेलं आहे. या लूकमध्येही अक्षय खूप पावरफुल्ल दिसतो आहे. त्यांचा हा लूक सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षय कुमारने त्याचा हा लूक रिलीज केला. “नवरात्री, हे देवीला नमन आणि तिची अमर्याद शक्ती साजरी करण्याविषयी आहे. या शुभ प्रसंगी मी लक्ष्मीच्या रुपातील माझा लूक तुझ्यासोबत शेअर करत आहे. या कॅरेक्टरमध्ये उत्साहित आणि घाबरलेलो आहे. पण आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर निघाल्यानंतरच तर आयुष्य सुरु होतं. नाही का?”, अशी हे पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिली.

‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा तामिळ सिनेमा ‘कंचना’चा रिमेक आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’मध्ये अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत असेल. तर कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत असेल. सिनेमात अक्षय कुमार एका तृतीयपंथी भूताच्या रुपात दिसणार आहे. तसेच, या सिनेमात अभिनेता अमिताभ बच्चन हे देखील तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

या सिनेमाचं दिग्दर्शन राघव लॉरेंस करत आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी 5 एप्रिलला प्रजर्शित होईल. तुषार कपूर आणि शबीना खान हे या सिनेमाचे निर्माते आहेत. सिनेमाची कथा दिग्दर्शक फरहाद समजीने लिहिली आहे. या सिनेमात अभिनेता आर. माधवन आणि शोभिता धुलिपाला हे देखील मुख्य भूमिकेत असतील.

संबंधित बातम्या :

बॉलिवूड अभिनेत्री कल्की लग्नाआधीच प्रेग्नंट

‘Housefull 4’ Trailer : हाऊसफुल 4 चा ट्रेलर रिलीज, अक्षय, रितेश आणि बॉबीची तुफान कॉमेडी

खासदार आणि अभिनेत्री मीमी चक्रवर्तीचं पहिलं हिंदी गाणं रिलीज

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन आई झाली, लवकरच विवाहबंधनात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *