अमोल कोल्हेंचा 'पण' पूर्ण, बीडमध्ये जाऊन धनंजय मुंडेंच्या विजयाचा फेटा बांधला

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे बीडमध्ये निवडून आल्यामुळे डॉ. अमोल कोल्हे यांनी आपला 'पण' सोडला. त्यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमात फेटा बांधला (NCP Amol Kolhe).

अमोल कोल्हेंचा 'पण' पूर्ण, बीडमध्ये जाऊन धनंजय मुंडेंच्या विजयाचा फेटा बांधला

बीड : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बीडमध्ये जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येत नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला होता. अखेर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचं विधानसभा निवडणुकीत विजय झाला आणि आज ते कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे अमोल कोल्हे यांचं धनंजय मुंडे यांच्याहस्ते फेटा बांधून परळीत स्वागत करण्यात आलं (NCP Amol Kolhe wear Feta).

“बीडमध्ये जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून येत नाही तोपर्यंत मी बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही”, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला होता. हा निर्धार त्यांनी शिवस्वराज्य यात्रेदरम्यान आंबाजोगाई येथे केला होता. त्यांच्या या निर्धाराला तब्बल सहा महिने पूर्ण झाले. परळीत धनंजय मुंडे तब्बल 30 हजार मतांनी निवडून आले. या विजयानंतर अमोल कोल्हे यांनी फेटा बांधला (NCP Amol Kolhe wear Feta).

कर्जमाफी झाली, अंगठ्याचा गोंधळ कायम, ‘आधार’च्या घोळानं कर्जमाफीची वाट बिकट

नाथ प्रतिष्ठानच्यावतीने ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचं परळीत आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी फेटा बांधून अमोल कोल्हे यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी “अमोल कोल्हे यांना फेटा शोभून दिसतो’, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी बीडच्या जनतेचे आभार मानले.

विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळीत दोन वेळा कार्यक्रम घेतले. मात्र, वेळेअभावी त्यांना जनतेशी संवाद साधता आला नाही. अखेर ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या निमित्ताने धनंजय मुंडेंनी जनतेशी संवाद साधला.

500 कोटीपेक्षा जास्त खर्च, एक लाख पाहुणे, भाजप मंत्री बी. श्रीरामुलुंच्या मुलीचा शाही विवाहसोहळा

धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. भाजपला हा पराभव अनपेक्षित होता. कारण पंकजा मुंडे यांचे वडील आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे परळी मतदारसंघात चांगले वर्चस्व होते. दुसरीकडे बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी कसून प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या उमेदवार नमिता मुंडदा यांनी ऐनवेळी भाजपात प्रवेश केला आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. याचा फटका राष्ट्रवादीला बसला. केजमधून नमिता मुंदडा जिंकून आल्या आणि ती जागा भाजपच्या पदरात पडली. मात्र, बीडमध्ये निवडून आलेले धनंजय मुंडे सामाजिक न्याय मंत्री बनले.

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *