प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी विद्यार्थिनी प्रियकरासोबत पसार

अमरावती जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात राष्ट्रीय सेवा योजनांच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती

प्रेमविवाह न करण्याची शपथ घेणारी विद्यार्थिनी प्रियकरासोबत पसार

अमरावती : ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या मुहूर्तावर प्रेमविवाह न करण्याचा पण घेणाऱ्या विद्यार्थिनींपैकी एकीने अवघ्या दोन आठवड्यांतच शपथ मोडली. अमरावतीतील शपथ घेणारी एक विद्यार्थिनी प्रियकरासोबत पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Amravati Girl breaks oath)

अमरावती जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात राष्ट्रीय सेवा योजनांच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी प्रेम आणि प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यात आली होती. यामुळे गदारोळ झाल्यानंतर शपथ देणाऱ्या शिक्षकांना निलंबितही करण्यात आलं होतं. शिक्षकांचं निलंबन मागे घेण्यासाठी विद्यार्थिनी कॉलेजसमोर आंदोलनाला बसलेल्या असतानाच हा प्रकार समोर
आला.

ना प्रेम करणार, ना प्रेम विवाह, ‘व्हॅलेंटाईन्स डे’ला शाळेत विद्यार्थिनींना शपथ

प्रियकरासोबत पळालेल्या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी चांदुर रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं.

प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी तासिकांवर बहिष्कार टाकून आंदोलन सुरु केलं आहे. आम्ही शपथ स्वत:हून घेतली होती,  शिक्षकांनी आमच्यावर शपथ लादली देखील नव्हती, असा दावा विद्यार्थिनींनी केला आहे.

नेमकं काय झालं होतं?

प्रियकर-प्रेयसी आपल्या मनातील प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी ‘व्हॅलेंटाईन्स डे’ची हमखास निवड करतात. मात्र यंदाच्या जागतिक प्रेमदिनी अमरावतीच्या शाळेतील विद्यार्थिनींना वेगळीच शपथ देण्यात आली होती. प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याचा निश्चय विद्यार्थिनींनी केला होता.

काय होती शपथ?

‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेम विवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सूनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी ही शपथ घेते’ अशी शपथ विद्यार्थिनींकडून घेण्यात आली. (Amravati Girl breaks oath)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *