महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होईल? अमृता फडणवीस म्हणतात...

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होईल यावर भाष्य केलं आहे.

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होईल? अमृता फडणवीस म्हणतात...

मुंबई : महाराष्ट्राच्या निर्मितीपासून आजपर्यंत राज्याच्या महिला मुख्यमंत्री कोण होणार याविषयी अनेक तर्क लावण्यात आले आहेत. आता यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील भाष्य केलं (Amruta Fadnavis on First Women CM of Maharashtra). राजकारणापलिकडे जाऊन महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची क्षमता कोणामध्ये आहे असा प्रश्न अमृता फडणवीस यांना विचारला. त्यावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या नेत्या-माजी आमदार पंकजा मुंडे यांच्या नावाला पसंती दिली. त्या टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होत्या. यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं.

अमृता फडणवीस म्हणाल्या, “पहिल्या मुख्यमंत्री होण्याची क्षमता अनेक महिलांमध्ये आहे. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्री होण्याची क्षमता आहे. पंकजा मुंडे धाडसी आणि खंबीर महिला नेत्या आहेत.”

‘महिलांचा आदर कमी होईल असं विधान इंदोरीकर महाराजांनी करू नये’

अमृता फडणवीस म्हणाल्या, “लोकांवर प्रभाव असणाऱ्या लोकांनी आपल्या मतांचा लोकांच्या मनावर मोठा प्रभाव होतो हे लक्षात घ्यायला हवं. मी इंदोरीकर महाराज यांचे काही व्हिडीओ पाहिले आहेत. यात ते महिलांना काही प्रमाणात कमी लेखतात असं वाटलं. मला इंदोरीकर महाराजांबद्दल खूप आदर आहे. त्यांनी दिलेले सल्ले जीवनात उपयोगी पडतात. मात्र, त्यांच्यासारख्या लोकांनी महिलांचा आदर कमी होईल, असं कोणतंही विधान करु नये.”

‘टीकाकारांना धन्यवाद, त्यांनी मला सशक्त बनवलं’

शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी भैय्याजी जोशी यांना लिहिलेल्या पत्रावरही अमृता फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या, “प्रत्येक स्त्री वेगळी आहे. मला जे वाटतं ते मी बोलते. मी यापुढे देखील मला वाटेल ते बोलत राहिल. टीकाकारांना मी धन्यवाद देते. त्यांन मला आणखी सशक्त बनवलं. देवेंद्र फडणवीस यांना माझ्यामुळे अनेक गोष्टी सहन केल्या आहेत. मात्र, तरीही ते माझ्या पाठीशी नेहमीच उभे असतात.”

संबंधित बातम्या:

इंदोरीकर महाराजांबद्दल मला खूप आदर, पण… : अमृता फडणवीस

आधी आदित्य ठाकरेंचा ‘रेशीम कीडा’ उल्लेख, आता रश्मी ठाकरेंबद्दल अमृता फडणवीस म्हणतात….

माझ्यासाठी देवेंद्रनी अनेक गोष्टी सहन केल्या : अमृता फडणवीस

पहाटेच्या शपथविधीवर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

संबंधित व्हिडीओ:


Amruta Fadnavis on First Women CM of Maharashtra

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *