ओवेसींसमोर पाकिस्तान समर्थनार्थ नारे, तरुणीवर देशद्रोहाचा खटला

ओवेसींच्या समोर पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणारी आरोपी अमूल्या लिओना हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

ओवेसींसमोर पाकिस्तान समर्थनार्थ नारे, तरुणीवर देशद्रोहाचा खटला

बंगळुरु : ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत बंगळुरुत झालेल्या मेळाव्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा देणाऱ्या तरुणीवर देशद्रोहाचा खटला (Amulya leona booked under sedition case) चालवला जाणार आहे. आरोपी अमूल्या लिओना हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अमूल्याविरोधात देशद्रोहाच्या कलम ‘124 अ’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असदुद्दीन ओवेसी बंगळुरुमध्ये सीएए आणि एनसीआर विरोधात आयोजित मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी अमूल्या लिओना अचानक स्टेजवर गेली आणि जोरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे नारे देऊ लागली. तिच्या घोषणा ऐकताच व्यासपीठावरील पदाधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांनी तिच्याकडील माईक हिसकावून घेतला. खुद्द असदुद्दीन ओवेसींनीही यात हस्तक्षेप केला होता.

तरुणीच्या गोंधळामुळे देशभरात संतापाची एकच लाट उमटली. सर्वस्तरीय टीकेनंतर खुद्द असदुद्दीन ओवेसींनीही हात वर केले. आपल्या पक्षाचा संबंधित तरुणीशी काहीही संबंध नाही, ती एमआयएमची कार्यकर्ती नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. “माझ्यासाठी भारत जिंदाबाद होता आणि यापुढे राहील.” असं ओवेसी म्हणाले.

‘सभेत अशा व्यक्ती उपस्थित असल्याचं माहीत असतं, तर मी कधीही इथे आलो नसतो.’ असंही ओवेसी संतापून म्हणाले. “आमचा त्या मुलीशी काहीही संबंध नाही. आम्ही पाकिस्तानविरुद्ध आहोत आणि पाकिस्तान मुर्दाबाद आहे.” अशी टीकाही ओवेसींनी केली. (Amulya leona booked under sedition case)

Amulya leona booked under sedition case

संबंधित बातम्या : 

15 कोटी काय, त्यांच्यामागे 15 जण आले तरी सत्कार करेन, वारिस पठाणांना संजय राऊतांचा टोला

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *