चिडलेल्या रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुटल सोडल्या, सरकारच्या बदनामीचा प्रयत्न : अनिल परब

पियुष गोयल यांनी काल (26 मे) ट्विट करत महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात अपयशी ठरलं, असा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपाला अनिल परब यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं (Anil Parab on Piyush Goyal).

चिडलेल्या रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुटल सोडल्या, सरकारच्या बदनामीचा प्रयत्न : अनिल परब

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवर जनतेशी संवाद साधताना (Anil Parab on Piyush Goyal) रेल्वेकडे 80 ट्रेन मागितल्या तर 30 ते 40 ट्रेन मिळतात असं सांगितलं होतं. या विधानाचा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना एवढा राग आला की, 30 मे पर्यंत आमची 178 ट्रेनची मागणी होती. मात्र, त्यांनी एकाच दिवसात 152 ट्रेन देवून टाकल्या”, असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलं (Anil Parab on Piyush Goyal). याशिवाय रेल्वेचं वेळापत्रक उलट-सुटल करुन राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यामध्ये रंगलेलं ट्विटर युद्ध चांगलंच पेटलं आहे. पियुष गोयल यांनी काल (26 मे) ट्विट करत महाराष्ट्र सरकार प्रवासी आणण्यात अपयशी ठरलं, असा आरोप केला होता. त्यांच्या याच आरोपाला अनिल परब यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं. याशिवाय गुजरातला 1500 ट्रेन आणि महाराष्ट्राला फक्त 700 ट्रेन देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

महाविकास आघाडीची आज (27 मे) संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील तर शिवसेनेकडून परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित राहिले. यावेळी अनिल परब यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही सडकून टीका केली.

“गेल्या दोन दिवसात रेल्वे मंत्री पियुष गोयल हे ट्विटरवर सारखं सांगत आहेत की, आम्ही ट्रेन पाठवतो. पण, महाराष्ट्र श्रमिकांना पाठवत नाही, असा आरोप करत आहेत. माझ्याकडे काही फोटो आहेत. फोटोत हजारोंच्या गर्दीने ट्रेनची वाट पाहत उभे राहिलेले हे श्रमिक नाहीत का?”, असा सवाल अनिल परब यांनी केला.

“पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळाचं संकंट होतं. पश्चिम बंगाल सरकारने आम्हाला सांगितलं की, दिवसाला फक्त दोन ट्रेन पाठवा. त्यांचं आमच्याकडे पत्रदेखील आहे. आम्ही 30 मे पर्यंत 48 ट्रेनची मागणी केली होती. त्यांनी एका दिवसातच 43 ट्रेन पाठवल्या. एका दिवसात 43 ट्रेनचं वेळापत्रक बनवलं. याचा अर्थ लोक आपल्या घरीच जाऊच नयेत. सरकार बदनाम व्हावं”, असा घणाघात अनिल परब यांनी केला.

“रेल्वे प्रशासनाने ट्रेनच्या वेळा उलटसुलट केल्या आहेत. काल सकाळी साडे अकराची चेन्नई ट्रेन साडे दहा वाजता अनाऊन्स केली. धारावीचा पूर्ण 1500 प्रवाशांचा गृप होता. त्यांना अगोदर सांगितलं की, माटुंगा स्टेशनला साडे अकरा वाजता ट्रेन येईल. लोक धावतपळत स्टेशनला गेली. तिकडे गेल्यावर त्यांना सांगितलं की, ती ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवरुन सूटणार आहे”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

“ट्रेनचं वेळापत्रक उलटसूलट केलं जात आहे. आम्ही त्यांना पत्र लिहून वेळापत्रकबाबत आम्हाला कळवा, असं सांगितलं. परवापर्यंत (25 मे) सर्व व्यवस्थित सुरु होतं. अगोदर ते कळवत होते. आम्ही एसटी आणि बीएसटीच्या मदतीने लोकांना रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवत होतो. यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जात होतं. परंतु, परवापासून जाणीवपूर्वक स्टेशनवर गर्दी करायची आणि सरकारला बदनाम करायचं, असा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप अनिल परब यांनी केला.

“महाराष्ट्रातून 600 श्रमिक ट्रेन सुटल्या. यापैकी 24 मे पर्यंत किती सुटल्या आणि 25, 26 मे या दिवशी किती सुटल्या याचाही हिशोब करा. या सगळ्या ट्रेनचे पैसे महाराष्ट्र सरकारने दिले. महाराष्ट्र सरकारने श्रमिक ट्रेनसाठी आतापर्यंत 68 कोटी रुपये खर्च केले. केंद्र सरकारने श्रमिक ट्रेनसाठी आजपर्यंतन कोणतेही पैसे दिलेले नाहीत. तरीही एका ट्रेनला 50 लाख रुपये खर्च कसा येतो? याचा हिशोब केंद्र सरकारला विचारावा. केंद्र सरकारने कुठल्याही श्रमिकाकडून पैसे घेतले नाहीत. संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकारने केला”, असं अनिल परब यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या : 

फडणवीसांच्या आकडेवारीची सोप्या भाषेत चिरफाड करु : परिवहन मंत्री अनिल परब

Devendra Fadnavis | केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला एकूण 28 हजार 104 कोटी रुपये, देवेंद्र फडणवीसांनी लेखाजोखा मांडला

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *