नेहमी रात्री आठ वाजताच बोलून चार तास देतात, अनुराग कश्यपचा मोदींना टोला

पंतप्रधान हे नेहमी देशाला संबोधित करण्यासाठी रात्री 8 चाच वेळ का देतात, अशी तक्रार त्याने केली आहे.

Anurag Kashyap Criticize PM Modi, नेहमी रात्री आठ वाजताच बोलून चार तास देतात, अनुराग कश्यपचा मोदींना टोला

मुंबई : देशात कोरोना विषाषूचा वाढता प्रादुर्भाव पाहता (Anurag Kashyap Criticize PM Modi) त्याला आताच रोखणे गरजेचे आहे. जर, कोरोनाचा संसर्ग आता थांबला नाही भारताचा इटली होण्यास वेळ लागणार नाही, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 21 दिवसांसाठी लॉकडाऊन केलं जात असल्याचं घोषित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा मंगळवारी रात्री 8 वाजता केली (Anurag Kashyap Criticize PM Modi). त्यांच्या या घोषणेनंतर दिग्दर्शक अनुराग कश्यप हा त्यांच्यावर नाराज झाला आहे.

पंतप्रधान हे नेहमी देशाला संबोधित करण्यासाठी रात्री 8 चाच वेळ का देतात, अशी तक्रार त्याने केली आहे. रात्री 8 ऐवजी जर पंतप्रधान सकाळी 8 वाजता बोलले असते तर निदान त्यांना तयारी करायला विळ मिळाला असता, अशी टीका अनुरागने मोदींवर केली आहे.

हेही वाचा : भारतात लॉकडाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

याबाबत ट्विटरवर व्यक्त होत अनुरागने मोदींना टोला लगावला आहे. ‘रात्री आठ ऐवजी सकाळी आठ वाजता बोलले असते तरी बरं झालं असतं. संध्याकाळी चार वाजता घोषणा केली असती तरी व्यवस्था करुन ठेवली असती. नेहमी रात्री आठ वाजताच बोलतात आणि तयारीसाठी चार तासांचा अवधी देतात (Anurag Kashyap Criticize PM Modi). बस किंवा ट्रेन नाही म्हणून जे चालत घरी जाण्यासाठी निघाले असतील त्यांचं काय? आता काय बोलावं? ठीक आहे प्रभू!’, असं ट्विट अनुरागने केलं आहे.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

“कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पुढचे 21 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हे 21 दिवस नाही सांभाळलं तर आपला देश आणि आपण 21 वर्ष मागे जाऊ. अनेक कुटुंब उध्वस्त होतील. ही गोष्ट मी पंतप्रधान म्हणून नाही तर आपल्या परिवाराचा सदस्य म्हणून बोलत आहे. त्यामुळे बाहेर पडू नका, घरातच राहा”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे मंगळवारी रात्री आठ वाजता पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

“देशाला वाचवणं ही भारत सरकार, राज्य सरकार, प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि पंतप्रधान म्हणून माझी प्राथमिकता आहे. त्यामुळे मी विनंती करतो, तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. हा लॉकडॉऊन 21 दिवसांता असेल. याचा अर्थ 3 आठवड्यांचा असेल. येणारे पुढचे 21 दिवस फार महत्त्वाचे आहेत. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत”, असं नरेंद्र मोदी (Anurag Kashyap Criticize PM Modi) म्हणाले.

संबंधित बातम्या :

संपूर्ण देशभरात लॉकडाऊन, जनता कर्फ्यूपेक्षा कडक कर्फ्यू, घराबाहेर पडण्यास मज्जाव : पंतप्रधान मोदी

21 दिवस महत्त्वाचे, अन्यथा संपूर्ण देश 21 वर्ष मागे जाईल : नरेंद्र मोदी

अन्नधान्य, पोलीस ते दुधाची गाडी, लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक सुविधा बंद होणार नाहीत : उद्धव ठाकरे

संपूर्ण देशात लॉकडाऊन, कुठे काय सुरु आणि काय बंद?

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *