पुढील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देता येतील की नाही याबाबत साशंकता : अशोक चव्हाण

लॉकडाऊन आणि त्यानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाचा अभ्यास करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची समिती नेमण्यात आली आहे.

पुढील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देता येतील की नाही याबाबत साशंकता : अशोक चव्हाण

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यात शासकीय (Government Employees) कर्मचाऱ्यांना पगार देता येईल का नाही? हे सांगणे कठीण आहे. कोरोना नसलेल्या 9 जिल्ह्यांत शिथिलता देता येईल का, यावर विचार सुरु आहे, अशी माहिती राज्याचे (Government Employees) सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी दिली.

कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन आवश्यक आहे. पण, आता आर्थिक संकट देखील येणार आहे. सर्व काही बंद असल्याने व्यापारी, कारखानदार पगार कसे देणार हा प्रश्न आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पुढील महिन्याचे सरकारी कर्मचाऱ्यांचे देखील पगार देता येतील का नाही, याबाबत मंत्री अशोक चव्हाण यांनी शंका व्यक्त केली आहे.

लॉकडाऊन आणि त्यानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाचा अभ्यास करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती यावर (Government Employees) अभ्यास करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं. ते आज नांदेड इथं माध्यमांशी बोलत होते, तेव्हा त्यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रातील 9 जिल्हे हे अजूनही कोरोनामुक्त जिल्हे आहेत, तर काही जिल्ह्यांत कोरोनारुग्णांची संख्या ही अत्यंत कमी आहे. त्यामुळे अशा जिल्ह्यांमध्ये व्यवहार सुरु करायचे का, याचा विचार करत असल्याचंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

राज्यात कुठे किती नवीन कोरोना रुग्ण?

आज (11 मार्च) राज्यात 106 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 680 वर पोहोचला आहे.

राज्यात कुठे किती रुग्णांची वाढ?

  • मुंबई – 86
  • औरंगाबाद – 2
  • मालेगाव – 5
  • पनवेल – 2
  • कल्याण – 1
  • ठाणे  – 4
  • पालघर – 1
  • नाशिक – 2
  • अहमदनगर – 1
  • पुणे – 3
  • वसई विरार – 1
  • नागपूर – 2
  • कोल्हापूर – 1

Government Employees

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई95100666335405
पुणे (शहर+ग्रामीण)42092172021152
ठाणे (शहर+ग्रामीण)65324295481769
पालघर 102265223202
रायगड91104222167
रत्नागिरी91662432
सिंधुदुर्ग2622205
सातारा1855107169
सांगली64838519
नाशिक (शहर +ग्रामीण)76634435306
अहमदनगर (शहर+ग्रामीण)98056426
धुळे161086478
जळगाव 63553661361
नंदूरबार 28216711
सोलापूर44782233357
कोल्हापूर 132283120
औरंगाबाद86594489345
जालना108458047
हिंगोली 3442862
परभणी2271197
लातूर 75835037
उस्मानाबाद 41025117
बीड2411245
नांदेड 63925427
अकोला 1900154795
अमरावती 91664737
यवतमाळ 46929814
बुलडाणा 42021617
वाशिम 2531105
नागपूर2156140423
वर्धा 44141
भंडारा175902
गोंदिया 2171623
चंद्रपूर1841020
गडचिरोली136711
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)210031
एकूण2,67,6651,49,00710,695

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांचा 5 वा. जनतेशी संवाद, उद्धव ठाकरे लॉकडाऊनची घोषणा करणार?

अकोल्यात कोरोनाग्रस्त रुग्णाची गळ्यावर ब्लेड फिरवून आत्महत्या, उपचारादरम्यान मृत्यू

राज्यपाल नियुक्त सदस्यावरुन चंद्रकांत पाटलांचं घटनेकडे बोट, जयंत पाटलांचं उत्तर

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *