आरे कारशेड प्रकरण भोवलं, अश्विनी भिडेंची मेट्रो 3 प्रकल्पावरुन उचलबांगडी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडला ब्रेक लावल्यानंतर आता मेट्रो 3 च्या प्रकल्पावरुन अश्विनी भिडे यांची उचलबांगडी करण्यात (Ashwini bhide remove metro 3)  आली आहे.

आरे कारशेड प्रकरण भोवलं, अश्विनी भिडेंची मेट्रो 3 प्रकल्पावरुन उचलबांगडी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरे कारशेडला ब्रेक लावल्यानंतर आता मेट्रो 3 च्या प्रकल्पावरुन अश्विनी भिडे यांची उचलबांगडी करण्यात (Ashwini bhide remove metro 3) आली आहे. त्यांच्या जागी मुंबई मेट्रो 3 च्या व्यवस्थापकीय संचालकपदी रणजितसिंग देओल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रणजितसिंग देओल हे महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करत होते. रणजितसिंग देओल हे मेट्रो 3 चा कार्यभार पाहणार आहेत. भिडे यांचा मेट्रो 3 च्या संचालक पदाचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण झाला होता. त्यामुळे भिडे यांच्याकडे कोणती जबाबदारी दिली जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आरे येथील प्रस्तावित मेट्रो 3 च्या कारशेडचं अश्विनी भिडे यांनी समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही आरे कारशेडला विरोध दर्शवला होता. या कारशेडचं समर्थन करणाऱ्या अश्विनी भिडे यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला आहे.

तुकाराम मुंढेंची बदली

दरम्यान अश्विनी भिडे यांच्यासोबत इतर 20 अधिकाऱ्यांच्याही बदली करण्यात आल्या आहेत. त्यात कडक शिस्तीमुळे प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढेचाही समावेश आहे. तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली (Ashwini bhide remove metro 3)  आहे.

मुंढे हे गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे एड्स नियंत्रण प्रकल्पाचे संचालक म्हणून काम पाहत होते. मात्र नुकतंच नागपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. याआधी या पदावर अभिजित बांगर काम करत होते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *