औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, खासदार इम्तियाज जलील आक्रमक

या कठीण काळात दारु विक्री करण्याची इतकी घाई का आहे? मग सर्वच दुकानं सुरु करा ना, केवळ दारुच्या दुकानांनाच ही विशेष सूट का?' असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला आहे. (Aurangabad AIMIM MP Imtiaz Jaleel objects to open liquor shops during corona lockdown)

औरंगाबादमध्ये दारुची दुकानं उघडल्यास महिलांसह रस्त्यावर उतरु, खासदार इम्तियाज जलील आक्रमक

औरंगाबाद : औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्यात मद्यविक्रीची दुकाने उघडण्यास विरोध केला आहे. ‘रेड झोन’ असतानाही दारुची दुकाने उघडल्यास लॉकडाऊन तोडून ती बंद करायला भाग पाडू, महिलांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करु, असा इशारा जलील यांनी दिला आहे. (Aurangabad AIMIM MP Imtiaz Jaleel objects to open liquor shops during corona lockdown)

‘रेड झोनमध्येही दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जर औरंगाबादमधील दुकाने उघडली, तर आम्ही लॉकडाऊनचे सर्व नियम तोडू आणि ही दुकाने जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडू. आम्ही बर्‍याच महिलांना रस्त्यावर येण्यास सांगू. दारु विक्री करुन आपल्या माता-भगिनींसाठी समस्या निर्माण करण्याची ही वेळ नाही.’ असा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन दिला आहे. ‘कोरोना’च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे औरंगाबाद जिल्हा ‘रेड झोन’मध्ये येतो.

हेही वाचा : महाराष्ट्रात दारुची दुकानं उघडणार, पण नियम काय?

निम्न वर्गातील स्त्रियांसाठी ही (दारुची दुकानं) मोठी समस्या आहे, त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. माझ्या मोलकरणीचा नवरा दारुच्या नशेत घरी आल्यावर रोज तिला मारहाण करतो. या कठीण काळात दारु विक्री करण्याची इतकी घाई का आहे? मग सर्वच दुकानं सुरु करा ना, केवळ दारुच्या दुकानांनाच ही विशेष सूट का?’ असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला आहे.

पाण्यावर प्रथम हक्क माणसांचा, नंतर गुरांचा आणि अखेरीस उद्योग धंद्यांसाठी. तुम्हाला माहित आहे का, किती भागात दर 9 दिवसांनी फक्त एका तासासाठी पाणी मिळते? मी विकास आणि उद्योगांच्या बाजूने आहे. परंतु जेव्हा एखादी कंपनी पैसे कमवून सीएसआर खर्च करण्यापासून परावृत्त होते, तेव्हा मी आक्षेप घेणारच, असंही जलील म्हणतात. (Imtiaz Jaleel on liquor shops lockdown)

हेही वाचा : पुणे शहरासह जिल्ह्यात दारुची दुकाने बंदच राहणार

एमआयडीसीच्या पाण्याचे स्त्रोत काय आहे ते सांगू शकता? ‘कोविड19’ सोबत लढण्यासाठी या बिअर उत्पादकांनी त्यांच्या सीएसआर फंडातून शहरासाठी किती खर्च केला हे आपण दारु कारखान्यांच्या वतीने सांगू शकता का? जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकानेही नाही, असा प्रतिप्रश्न जलील यांनी एका ट्विटर युजरला केला आहे.

(Aurangabad AIMIM MP Imtiaz Jaleel objects to open liquor shops during corona lockdown)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *