गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लॉकडाऊन तोडला, पकडल्यावर म्हणाला, तिची खूप आठवण येत होती

एका 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं. ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन उल्लंघनचा हा पहिला गुन्हा आहे.

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लॉकडाऊन तोडला, पकडल्यावर म्हणाला, तिची खूप आठवण येत होती
Follow us
| Updated on: Apr 15, 2020 | 6:17 PM

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियात लॉकडाऊनदरम्यान (Australia Lockdown) एक विचित्र प्रकार घडला. इथे एका 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं. त्यानंतर या व्यक्तीला एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात लॉकडाऊन उल्लंघनचा (Australia Lockdown)) हा पहिला गुन्हा आहे.

ऑस्ट्रेलियात एका 35 वर्षीय जॉनथन डेव्हिड नावाच्या व्यक्तीने लॉकडाउनचं उल्लंघन केलं. या व्यक्तीला पळ काढताना अटक करण्यात आली. त्याला पर्थच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या व्यक्तीने आधी खाद्यपदार्धांसाठी लॉकडाऊनचं उल्लंघन केलं आणि त्याच्या काही तासातच त्याने पुन्हा एकदा पळ काढण्याचा प्रयत्न केला, असं पर्थच्या न्यायालयात सांगण्यात आलं. जेव्हा जॉनथनला त्याने लॉकडाऊनचं उल्लंघन का केलं असं विचारण्यात आलं. तेव्हा त्याने सांगितलं, “मला माझ्या गर्लफ्रेंडची खूप आठवण येत होती”.

ज्या हॉटेलमध्ये जॉनथनला क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्या हॉटेलच्या फायर एग्झिटपर्यंत पोहोचण्यात तो यशस्वी झाला होता. तो हॉटेल कर्मचाऱ्यांना फसवण्यात यशस्वी झाला (Australia Lockdown)). मात्र, तो सीसीटीव्ही फुटेजला चुकवू शकला नाही.

जॉनथन डेव्हिडल हा 25 मार्चला व्हिक्टोरियाच्या दक्षिण राज्य पर्थला पोहोचला. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कायद्याअंतर्गत त्याला 14 दिवस वेगळं ठेवणं आवश्यक होतं. त्यामुळे त्याला पर्थच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं होतं. जर तो त्या हॉटेलमध्ये राहिला असता, तर त्याला सोमवारी मुक्त करण्यात येणार होतं. मात्र, आता त्याला पुन्हा 1 महिन्यासाठी तुरुंगवास भोगावा लागणार आहे. तसेच, त्याला दोन हजार ऑस्ट्रेलियन डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पोलिसांनी आतापर्यंत हजारपेक्षा जास्त लोकांवर लॉकडाऊनचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला आहे. यामध्ये स्ट्रीट कार रॅलीत सहभागी होणाऱ्यांचाही समावेश होता. पोलिसांनी अशा लोकांवरही दंड लावला होता जे त्यांच्या गाडीत बसून पिझ्झा (Australia Lockdown) खात होते.

संबंधित बातम्या :

ऑनलाईन ऑर्डरमध्ये वाढ, लॉकडाऊनदरम्यान अमेझॉनकडून 75 हजार नोकऱ्या

‘कोरोना’बाबत लपवाछपवी, चीनला गंभीर परिणाम भोगावे लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत

आधी इशारा, आता आदेश, ‘WHO’च्या निधीला डोनाल्ड ट्रम्प यांची स्थगिती

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.