रिक्षा चालकांमध्ये दुपारी भांडण, संध्याकाळी हत्या

जळगाव : दुपारी भांडण झालं आणि संध्याकाळी भांडणाने टोकाचं रुप घेत हत्येत रुपांतर केलं. जळगाव रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकाची हत्या झाली. इस्माईल शहा गुलाब शहा उर्फ माल्या असे 38 वर्षीय रिक्षाचालकाचे नाव आहे. जळगाव शहरातील या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. इस्माईल शहा गुलाब शहा उर्फ माल्या आणि नितीन जगन पाटील उर्फ भैय्या …

रिक्षा चालकांमध्ये दुपारी भांडण, संध्याकाळी हत्या

जळगाव : दुपारी भांडण झालं आणि संध्याकाळी भांडणाने टोकाचं रुप घेत हत्येत रुपांतर केलं. जळगाव रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा चालकाची हत्या झाली. इस्माईल शहा गुलाब शहा उर्फ माल्या असे 38 वर्षीय रिक्षाचालकाचे नाव आहे. जळगाव शहरातील या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

इस्माईल शहा गुलाब शहा उर्फ माल्या आणि नितीन जगन पाटील उर्फ भैय्या या दोन रिक्षाचलकांमध्ये दुपारी जोरदार भांडण झालं. या भांडणाचं रुपांतर संध्याकाळी हत्येत झालं. जळगाव रेल्वे स्टेशन परिसरात संध्याकाळच्या सुमारास रिक्षा इस्माईल गुलाब शहाची हत्या आहे.

इस्माईल हा आपल्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यासाठी का गेला, याचा राग मनात धरुन नितीन पाटील याने चाकूने भोसकून इस्माईलची हत्या केली. आरोपी नितीन जगन पाटील उर्फ भैय्या सध्या फरार आहे.

रेल्वे स्थानकावर प्रवासी भरण्यावरुन कायम रिक्षा चालकांमध्ये हाणामाऱ्या होत असतात. रेल्वे स्थानकावर वाढते अवैध धंदे, रात्रभर चालणाऱ्या हात गाड्या, तसेच टवाळखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *