कर्जाचे हप्ते न फेडल्याने नितेश राणेंच्या ताफ्यातील गाडीवर बँकेची कारवाई; धाडली जप्तीची नोटीस

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी यासंदर्भातील कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली. | Nitesh Rane

कर्जाचे हप्ते न फेडल्याने नितेश राणेंच्या ताफ्यातील गाडीवर बँकेची कारवाई; धाडली जप्तीची नोटीस
Nitesh Rane
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 12:07 AM

सिंधुदुर्ग: नितेश राणे यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या इनोवा कार आणि इतर बारा बोलेरो गाड्यांसाठी जिल्हा बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, अजूनपर्यंत सदर वाहनांची रक्कम बँकेकडे जमा झालेली नाही. त्यामुळे नितेश राणे (Nitesh Rane) आणि संबंधित जामीनदारांना जिल्हा बँकेकडून नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. ( Bank send notice for seizing car of Nitesh Rane for non payment of non payment of installment of auto loan)

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी मंगळवारी यासंदर्भातील कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली. कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्याने संबंधित वाहन मालक आणि जामीनदार वारंवार नोटीसा पाठवूनही थकबाकीची रक्कम अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे काही काळ उलटल्यानंतर जिल्हा बँकेने संबंधित वाहन मालक आणि जामीनदारांना 101 ची नोटीस पाठवून गाड्या जप्तीचे आदेश दिले आहेत.

सध्या नितेश राणे फिरवत असलेली गाडी ही रत्नागिरीतील वळंजू यांच्या नावावर असून कणकवलीच्या खोट्या पत्त्यावर सदर गाडीचे कागदपत्रे करून बँकेकडून कर्ज दिलं गेले. बँकेने कोणतीही ही खातरजमा न करता वळंजू यांना कर्ज दिले. त्यामुळे बँकेची खोटा पत्ता देऊन फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत पत्रकार परिषद घेऊन सविस्तर खुलासा करणार आहेत.

‘नारायण राणेंच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी’

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना अडचणीत आणणारं मोठं विधान केलं आहे. ईडीने नारायण राणे यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या या मागणीमुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

आपली शिवसेना आता सेक्युलर, मर्द असाल तर सांगून टाका, नितेश राणेंचे थेट आव्हान

फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्या, तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा

‘सामना’च्या धमाका मुलाखतीपूर्वी नितेश राणेंचं ट्विट; उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर शेलक्या शब्दात टीका

( Bank send notice for seizing car of Nitesh Rane for non payment of non payment of installment of auto loan)

Non Stop LIVE Update
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.