ATM द्वारे पैसे काढताना आता पासवर्डसोबत OTP टाकावा लागणार

आता तुम्हाला एटीएममधून (ATM)  पैसे काढताना पिनसोबतच (PIN) ओटीपीही (OTP) टाकावा लागणार आहे. नुकतंच कॅनरा बँकेने ही नवी प्रणाली कार्यरत केली आहे.

ATM द्वारे पैसे काढताना आता पासवर्डसोबत OTP टाकावा लागणार
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 12:17 PM

नवी दिल्ली : सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा (ATM) वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी सर्रास करतो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी आता तुम्हाला एटीएममधून (ATM)  पैसे काढताना पिनसोबतच (PIN) ओटीपीही (OTP) टाकावा लागणार आहे. नुकतंच कॅनरा बँकेने ही नवी प्रणाली कार्यरत केली आहे.

यानुसार, जर तुम्ही एटीएमद्वारे 10 हजारांपेक्षा जास्त पैसे काढले, तर तुम्हाला एटीएम पिनसोबत ओटीपी टाकावा लागणार आहे. कॅनरा बँकेने पैसे काढण्यासाठी 10 हजारांची मर्यादा ठेवली आहे. यापेक्षा जास्त पैसे काढल्यास तुम्हाला ओटीपी टाकवा लागणार आहे. कॅनरा बँकेप्रमाणे इतर बँकाही ही प्रणाली लागू करण्याची शक्यता आहे.

देशातील सर्व बँकाना एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणूक थांबवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात असे आदेश रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत. यामुळे कॅनरा बँकेने सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे.

एटीएम कार्डद्वारे पैसे काढताना फसवणूक, कार्ड क्लोनिंग अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतात. त्यामुळे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात RBI ने सर्व बँकांनी एटीएममध्ये अँटी स्किमिंगचे मशीन लावावे असे सांगितले होते.

गेल्या वर्षभरात दिल्लीत 2018-19 मध्ये एटीएम कार्डच्या फसवणुकीचे 179 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. देशभरात एटीएमद्वारे होणाऱ्या अनेक फसवणूक या रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान होतात असेही माहिती नुकतीच समोर आली आहे. नुकतंच बँकांच्या राज्यस्तरीय बैठकीत दोन एटीएम ट्रांझेक्शनदरम्यान 6 ते 12 तासांपर्यंतचा कालावधी ठेवावा, असा उपाय सुचवण्यात आला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.