दादांच्या बारामतीत होम क्वारंटाईनवाल्यांची दादगिरी, थेट पोलिसांवरच हल्ला

होम क्वारंटाईन असलेल्या लोकांनी (Baramati home quarantine police attack) पोलिस पथकावरच हल्ला चढवल्याचा प्रकार बारामती शहरातील जळोची येथे घडला.

दादांच्या बारामतीत होम क्वारंटाईनवाल्यांची दादगिरी, थेट पोलिसांवरच हल्ला

बारामती : होम क्वारंटाईन असलेल्या लोकांनी (Baramati home quarantine police attack) पोलिस पथकावरच हल्ला चढवल्याचा प्रकार बारामती शहरातील जळोची येथे घडला.  होम क्वारंटाईन असलेल्या लोकांना बाहेर फिरण्यास मज्जाव करणाऱ्या स्थानिक युवकांना (Baramati home quarantine police attack) मारहाण करून नंतर पोलिस पथकावरच हल्ला चढवण्यात आला. या हल्ल्यामध्ये बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह तीन अधिकारी आणि सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. (Baramati home quarantine police attack)

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर बाहेरगावाहून प्रवास करून आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. बारामती शहरातील जळोची येथील काही नागरिकांनाही आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. तसा शिक्काही या नागरिकांच्या हातावर मारण्यात आला आहे. काल दुपारी हे नागरिक परिसरात फिरत असताना त्यांना स्थानिक तरुणांनी त्यांना बाहेर फिरण्यास मज्जाव केला. होम क्वारंटाईन असताना बाहेर फिरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नये अशी विनंती या तरुणांनी केली.

त्यावरून स्थानिक तरुण आणि या होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्यात वादावादी झाली. यात त्यांनी काही युवकांना मारहाण केली. यांची माहिती मिळाल्यानंतर बारामती शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही गटांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांचे न ऐकता होम क्वारंटाईन असलेल्या गटाने पोलिसांवरच हल्ला चढवला.

लोखंडी गज, काठ्या, दगडाने केलेल्या या हल्ल्यामध्ये पोलिस निरीक्षक औदुंबर पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी शेंडगे, पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार, पद्मराज गंपले यांच्यासह पोलिस कर्मचारी पोपट नाळे, पोपट कोकाटे, सिद्धेश पाटील, महिला पोलिस कर्मचारी स्वाती काजळे, रचना काळे यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 4 लोकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकारानंतर जळोचीमध्ये राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *