पोटच्या मुलीचं आजारपण असह्य, बीडमध्ये बापाने चिमुरडीला गळा दाबून संपवलं

मुलगी सतत आजार असायची. तिचे आजारपण असह्य झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली आरोपी पित्याने दिली आहे (Beed Father Murders Daughter)

पोटच्या मुलीचं आजारपण असह्य, बीडमध्ये बापाने चिमुरडीला गळा दाबून संपवलं

बीड : मुलीचं आजारपण सहन न झाल्याने पित्याने तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. सहा वर्षांची चिमुकली सतत आजारी पडत असल्याने सख्ख्या वडिलांनी गळा दाबून तिचा जीव घेतला. (Beed Father Murders Daughter) सलग दुसऱ्या दिवशी हत्येच्या घटनेने बीड हादरलं आहे.

वडवणी गावात असलेल्या फुल विक्रेत्याची सहा वर्षांची मुलगी सोमवारी सात वाजल्यापासून बेपत्ता होती. कुटुंबाने आसपासच्या परिसरात शोधाशोध केली, मात्र मुलगी कुठेच न सापडल्याने सर्व जण चिंतेत होते. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास चिमुरडीचा मृतदेह गावाशेजारील वाड्यात आढळल्याने एकच खळबळ उडाली.

दरम्यान, मृतदेह मिळाल्यानंतरही वडिलांच्या चेहऱ्यावर कसलेच दुःख न दिसल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी बापाची कसून चौकशी केली. त्यावर आपणच मुलीची हत्या केल्याची कबुली त्याने स्वतः दिली.

मुलगी सतत आजार असायची. तिचे आजारपण असह्य झाल्याने टोकाचे पाऊल उचलल्याची कबुली आरोपी पित्याने दिली आहे. पोलिसांनी चिमुकलीच्या हत्येप्रकरणी पित्याला बेड्या ठोकल्या आहेत.

केजमध्ये तिहेरी हत्याकांड

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना परवा रात्री (बुधवार 13 मे) घडली होती. 12 जणांच्या टोळक्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी तीन बाईकसह जीवनावश्यक वस्तू जाळल्या. युसूफ वडगावमध्ये ही घटना घडली.

(Beed Father Murders Daughter)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *