भालचंद्र गणेश मंदिर हजारो दिव्यांनी उजळले

बीड : बीड तालुक्यातील लिंबागणेश इथल्या भालचंद्र गणपती मंदिरात दीपावली पाडव्यानिमित्ताने गुरुवारी ८ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसात वाजता दिपोत्सव साजरा करण्यात आला.  हजारो  दिव्यांनी  गणपतीचे मंदिर लखलखले. ग्रामस्थांच्या वतीने मागील काही वर्षापासून हा दीपोत्सव आयोजित करण्यात येतो. गुरुवारी सायंकाळी  भालचंद्र गणपती मंदिरात मंदिराचा गाभारा, मंदिर परिसर, प्रवेशव्दार, दीपमाळ या परिसरात दिवे प्रज्वलित करण्यात आले.  या दीपोत्सवाचे …

भालचंद्र गणेश मंदिर हजारो दिव्यांनी उजळले

बीड : बीड तालुक्यातील लिंबागणेश इथल्या भालचंद्र गणपती मंदिरात दीपावली पाडव्यानिमित्ताने गुरुवारी ८ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसात वाजता दिपोत्सव साजरा करण्यात आला.  हजारो  दिव्यांनी  गणपतीचे मंदिर लखलखले. ग्रामस्थांच्या वतीने मागील काही वर्षापासून हा दीपोत्सव आयोजित करण्यात येतो.

गुरुवारी सायंकाळी  भालचंद्र गणपती मंदिरात मंदिराचा गाभारा, मंदिर परिसर, प्रवेशव्दार, दीपमाळ या परिसरात दिवे प्रज्वलित करण्यात आले.  या दीपोत्सवाचे उदघाटन व्दाराचार्य अमृत महाराज जोशी यांच्या हस्ते सायंकाळी करण्यात आले.

खुल्या रांगोळी स्पर्धा रंगल्या

भालचंद्र मंदिराच्या परिसरात दीपावलीच्यानिमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रांगोळी स्पर्धकांनी सामाजिक विषयांवर रांगोळ्या रेखाटून वाहवा मिळवली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *