मराठी कलाकारांचं वास्तव्य असलेलं बिंबीसारनगर सील, एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना, नोकरही बाधित

मुंबईतील बिंबीसारनगरमध्ये सुबोध भावे, जयवंत वाडकर, आतिशा नाईक, स्वप्नील जयकर यासारखे अनेक मराठी कलाकार राहतात. (Bimbisarnagar sealed Corona Patient Found)

मराठी कलाकारांचं वास्तव्य असलेलं बिंबीसारनगर सील, एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना, नोकरही बाधित
Follow us
| Updated on: Mar 31, 2020 | 8:54 AM

मुंबई : ‘कोरोनाग्रस्त’ व्यक्ती आढळल्यामुळे मुंबईच्या गोरेगाव भागातील बिंबीसारनगर सील करण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून मुंबई महापालिका आणि मुंबई पोलिसांकडून उपाययोजना करण्यात आली आहे. या भागात अनेक मराठी कलाकारांचं वास्तव्य आहे. (Bimbisarnagar sealed Corona Patient Found)

मुंबईतील बिंबीसारनगरमध्ये सुबोध भावे, आतिशा नाईक, स्वप्नील जयकर यासारखे अनेक मराठी कलाकार राहतात. तर दिग्गज अभिनेते जयवंत वाडकर यांच्या बिल्डिंगमध्ये संबंधित ‘कोरोनाग्रस्त’ कुटुंब राहतं. ‘कोरोनाग्रस्त’ व्यक्ती आढळल्यामुळे कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नाही.

दरम्यान, इथली परिस्थिती खूप भीषण असल्याचं जयवंत वाडकर यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी सरकारच्या सूचना पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

लंडनला शिक्षणासाठी गेलेल्या महिलेला कोरोना वायरसची लागण झाली आहे. त्यामुळेच तिच्या कुटुंबातील आई, वडील, भाऊ आणि नोकरालाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कुटुंबातील चारही जणांना हिरानंदानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Bimbisarnagar sealed Corona Patient Found)

महापालिकेच्या आरोग्य विभागाने समूह संसर्ग होऊ नये, यासाठी बिंबीसार नगरात प्रवेशबंदी केली. तर महापालिका आणि पोलिसांनी निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात केली आहे

मुंबईत गेल्या 24 तासांत 28 नवे कोरोनाग्रस्त आढळले आहेत, तर संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात कालच्या दिवसात सापडलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 47 वर गेली आहे.

वरळी कोळीवाडा सील

मुंबईतील वरळी कोळीवाडा येथे पाचहून अधिक कोरोना संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वरळी कोळीवाडा सील करण्यात आला आहे. मागील 2 दिवसात त्यांना उपचारासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसह पोलिस प्रशासन हायअलर्टवर असल्याचं पाहायला मिळत आहेत.

कोळीवाड्यात जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच कुणाला बाहेरही येऊ दिले जात नाही. या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी देखील युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे.

कोळीवाडा हा प्रचंड दाट लोकवस्ती असलेला परिसर आहे. येथे बैठ्या चाळीत नागरिक राहतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाल्यास मुंबईवरील कोरोनाचा धोका अनेक पटीने वाढणार आहे. हाच धोका लक्षात घेऊन कोरोना संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिका प्रशासनासह इतर यंत्रणा अलर्ट झाल्या.

(Bimbisarnagar sealed Corona Patient Found)

Non Stop LIVE Update
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय
तिढा सुटला,रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर सामंतांकडून मोठा निर्णय.