पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला या आठ देशांचे प्रमुख उपस्थित राहणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला BIMSTEC देशांच्या प्रमुखांसह आठ देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलंय. बिम्सटेकमध्ये भारतासह दक्षिण आशियातील आणि पूर्व आशियातील बंगालच्या खाडीशी संबंधित सात देश आहेत. यामध्ये बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूटानचा समावेश आहे. याव्यतिरिक्त किर्गिस्तानचे राष्ट्रपती आणि मॉरिशिअसच्या पंतप्रधानांनाही निमंत्रण देण्यात आलंय. यावर्षी प्रवासी भारतीय दिनाच्या निमित्ताने मॉरिशिअसचे …

, पंतप्रधान मोदींच्या शपथविधीला या आठ देशांचे प्रमुख उपस्थित राहणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला BIMSTEC देशांच्या प्रमुखांसह आठ देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलंय. बिम्सटेकमध्ये भारतासह दक्षिण आशियातील आणि पूर्व आशियातील बंगालच्या खाडीशी संबंधित सात देश आहेत. यामध्ये बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूटानचा समावेश आहे. याव्यतिरिक्त किर्गिस्तानचे राष्ट्रपती आणि मॉरिशिअसच्या पंतप्रधानांनाही निमंत्रण देण्यात आलंय.

यावर्षी प्रवासी भारतीय दिनाच्या निमित्ताने मॉरिशिअसचे पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. Neighbour first policy आणखी मजबूत करण्यासाठी या देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलंय. 2014 ला मोदींच्या शपथविधीसाठी SAARC देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आलं होतं. ज्यामध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफही सहभागी झाले होते.

यावेळी पाकिस्तानला दूर ठेवण्यात आलंय. पुलवामा हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे. त्यामुळे यावेळी पाकिस्तानला निमंत्रण दिलेलं नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मोदींनी विजयानंतर शुभेच्छा दिल्या होत्या. पंतप्रधान मोदी 30 मे रोजी सायंकाळी 7 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यासोबतच मंत्र्यांचाही शपथविधी होईल. कुणाला कोणतं मंत्रालय दिलं जाईल याबाबत अजून काहीही जाहीर करण्यात आलेलं नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *